बोगस ई-मेलपासून सावधान! वाचा अशी होतेय फसवणूक...

साम टीव्ही
रविवार, 28 जून 2020

 

  • बोगस ई-मेलपासून सावधान !
  • मोफत कोरोना टेस्टिंगच्या बहाण्यानं पाठवले जातायेत फिशिंग ई-मेल
  • बँकांकडून ग्राहकांना अलर्ट

बोगस ई-मेल्सपासून सावध राहा. कारण अलिकडच्या काळात मोफत कोरोना टेस्टिंगच्या बहाण्यानं लोकांची ऑनलाईन फसवणूक सुरू झालीय.

कोरोनामुळे सर्वांच्याच मनात भीतीचं वातावरण तयार झालंय. याच भीतीचा फायदा घेत काही भामट्यांनी लोकांची ऑनलाईन लूट सुरू केलीय. मोफत कोरोना टेस्ट असा मेल पाठवून लोकांची आर्थिक फसवणूक केली जातीय.  त्यामुळे बँकांनी आपल्या ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा दिलाय. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणामार्फत लोकांपर्यंत माहिती पोहचवली जातीय. मात्र मोफत चाचणी करण्याचा दावा करणारे काही ईमेल्स देशभरातील हजारो ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहेत. या ईमेलवरील लिंकवर क्लिक केल्यावर हॅकर्सकडून मोबाईलमधील गोपनीय माहितीवर डल्ला मारला जात असल्याचे सायबर तज्ञांचं म्हणणं आहे. 

काय काळजी घ्याल

त्यामुळे संशयास्पद वाटणाऱ्या कुठल्याही ई-मेल लिंकवर क्लिक करू नका, असे ई-मेल डिलीट करून टाका. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. कोणत्याही अज्ञात लिंकवर तुमचे बँक डिटेल्स देऊ नका. एखाद्या लिंकबाबत शंका वाटत असल्यास सायबर विभागात तक्रार करा

एक छोटासा मोह तुम्हाला चांगलाच महागात पडू शकतो. त्यामुळे अशा सायबर लुटीपासून स्वत:ला वाचवायचं असेल तर शक्यतो अज्ञात ई-मेलपासून दूर राहणं हाच उत्तम मार्ग आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live