शाकाहारींनो सावधान! तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर ही बातमी पाहाच!

साम टीव्ही
रविवार, 14 मार्च 2021

मांसाहार करणाऱ्यांची हाडं अधिक दणकट
मांसाहास न करणाऱ्यांना धोक्याचा इशारा
मांसाहार न करणाऱ्यांची हाडं ठिसूळ?

 

 

 

 

शाकाहारी असण्याचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. मांसाहारी लोकांच्या तुलनेत शाकाहारी लोकांची हाडं अधिक ठिसूळ असल्याचं दिसून आलंय. जर्मनीमध्ये झालेल्या नव्या संशोधनातून ही बाब समोर आलीय.

जगभरात अनेकांचा सध्या शाकाहाराकडे कल वाढताना दिसतोय. काही जण प्राण्यांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, काही जण आरोग्याच्या कारणास्तव,तर काही जण पर्यावरण प्रेमापोटी शाकाहाराला प्राधान्य देतात. मात्र एका संशोधनातून शाकाहारी लोकांची चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय. मांसाहारी आणि व्हेगन म्हणजे दुग्धजन्य पदार्थही न खाणाऱ्या शाकाहारी लोकांसंदर्भात हे संशोधन करण्यात आलंय. दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाहार न करणाऱ्यांची हाडं ही मांसाहार करणाऱ्यांपेक्षा अधिक ठिसूळ असतात अशी माहिती या अभ्यासामधून समोर आलीय. जर्मन फेड्रल इन्स्टीट्यूट फॉर रिस्क असेसमेंट या संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये हे निष्कर्ष समोर आलेत. 

या अभ्यासासाठी 32 मांसाहार करणाऱ्या व्यक्तींची तर 32 व्हेगन अशा एकूण 72 जणांची निवड करण्यात आली होती. पाहणीअंतर्गत या सर्वांच्या रक्ताचं आणि लघवीचं परिक्षण करण्यात आलं. याशिवाय अल्ट्रासाऊण्ड तंत्रज्ञानाच्या मदतीने हाडांची घनताही तपासून पाहण्यात आली.

सध्या जगभरात लोकं व्हेगन होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामागे प्राण्यांबद्दलचं प्रेम आणि पर्यावरणाबाबतची जागरूकता हे महत्वाचं कारण आहे. मात्र नव्या संशोधनामुळे या जीवनशैलीचे तोटेही समोर आलेत. साम टीव्ही 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live