अस्वलाचे थैमान: एकाच दिवशी तीन गावातील तिघांवर केला हल्ला

अभिजित घोरमारे
रविवार, 18 एप्रिल 2021

शेतशिवारात विविध शेतीकामासह अन्य कामासाठी  गेलेल्या तीन गावातील तीन तरुणांवर अचानक अस्वलाने  हल्ला केल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे.

भंडारा:  शेतशिवारात विविध शेतीकामासह अन्य कामासाठी  गेलेल्या तीन गावातील तीन तरुणांवर अचानक अस्वलाने Bear हल्ला केल्याची घटना भंडाऱ्यात Bhandara  घडली आहे. हल्ला करून तिघांनाही गंभीर जखमी केल्याची घटना जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात घडली आहे. हल्ल्यात सुदैवाने कोण्याच्याही जीवावर बेतले नाही.  In Bhandara the bear attacked three Persons in one day

तालुक्यातील डांभेविरली, गवराळा आणि खैरना आदी गावात ही घडली असुन या हल्ल्यात एकाची प्रकृती चिंताजनक तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मोरेश्वर नामदेव राऊत (३२)रा. डांभेविरली, खुशाल देवाजी खरकाटे (४९) रा. गवराळा आणि कुंदन बालाजी बावणे (२५) रा. खैरणा असे अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमींची नावे आहेत. 

आन्तरजिल्ह्यातील (गडचिरोली) Gadchiroli वनपरिक्षेत्रातून भटकलेल्या एका अस्वलाने तिन्ही गावातील शेतशिवारात धुमाकूळ घातला आहे. या धुमाकुळात अस्वलाने डांभेविरली आणि  गवराला येथील युवकांना शेतशिवारातच हल्ला करून गंभीर जखमी केले. तथापि या दोघांना गंभीर जखमी करुन अस्वल खैरना गावाकडे पसार झाले. दरम्यान यावेळी खैरना गावाच्या नदीकाठावर घटनेतील युवक म्हशी चरत असतांना त्याला देखील अस्वलाने हल्ला चढवत गंभीर जखमी केले.  हल्ला करुन अस्वल नदीपलिकडे आंतर जिल्ह्यातील जंगलात पळून गेले.  In Bhandara the bear attacked three Persons in one day

अस्वलाने दोघांना गंभीर जखमी केल्याची माहिती स्थानिक गावक-यांसह लाखांदूर येथील वनविभागाला Forest Department होताच येथील वनपरिक्षेत्राधिकारी सह अन्य वन कर्मचा-यांनी घटनास्थळी जाउन पोहिचले. जखमींना वैद्यकीय उपचारार्थ लाखांदूर Lakhandur ग्रामीण रुग्णालयात त्वरित दाखल करण्यात आले. या तिन्ही घटनांची लाखांदूर वनपरीक्षेत्र विभागासह पोलीसांनी नोंद केली असुन पुढील तपास सुरु आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live