सांगा नाना भाऊ आम्ही काय करावं...जगावं की मरावं!!! 

अभिजित घोरमारे
मंगळवार, 11 मे 2021

जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या एका शेतकऱ्याने नाना पटोले यांना संतप्त आर्त साद घातली आहे. सांगा नाना भाऊ आम्ही काय कराव...जगाव की मराव!!! असे या शेतकऱ्याने विचारलं आहे

भंडारा : जिल्ह्यात अवकाळी पाऊस Rains आणि गारपीटीन नुकसान झालेल्या एका शेतकऱ्याने नाना पटोले Nana Patole यांना संतप्त साद घातली आहे. सांगा नाना भाऊ आम्ही काय कराव...जगाव की मराव!!! असे या शेतकऱ्याने विचारलं आहे. Bhandara district farmer humble appeal to congress State president Nana Patole

ही हाक आहे. भंडारा Bhandara जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील जेवणाळा गावातील अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या एका शेतकऱ्याची!!! भंडारा जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून ह्या वेळी आलेला अवकाळी पाऊस हा सोसाटयाच्या वाऱ्यासह गारपीट युक्त असल्याने ह्या पावसाने भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात आपला हाहाःकार माजवला आहे.

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदार संघात ही ह्या अवकाळी पावसाने हाहाःकार माजवला असून जेवणाला येथील शेतकरी प्रमोद भूते यांचे उन्हाळी धान अक्षरक्ष: मोडून गेले आहे. तर काही भागात धान पिकांचे धानाचे लोंबे गळून पडल्याने पिकांची कांडी फक्त शिल्लक राहिली आहे. त्यामुळे विवंचनेत पडलेल्या प्रमोद भूते यांची चक्क नाना पटोले यांना आर्त हाक दिली आहे. Bhandara district farmer humble appeal to congress State president Nana Patole

अनिल गोटे म्हणतात....मोदी ऐषोआरामी शहेनशहा!

जिल्ह्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले ही स्थिति संपूर्ण जिल्ह्यात पहायला मिळत आहे. तर मागील खरीप हंगामात लागलेल्या मावा तुडतूडा ची रक्कम अद्याप न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून ह्यावेळी ही उन्हाळी  धान घेतले. मात्र तरी नुकसान हे शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजले आहे. नुकत्याच झालेल्या गारपीट युक्त पावसाने शेतकऱ्यांचे धान पिक नष्ठ केल्याने आता पंचनामा करून नुकसान भरपाई ची देण्याची मागणी जोर धरत आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live