अरे वा!!! भंडारा जिल्हावासीय वळले औषधी वनस्पती कडे....

bhandara
bhandara

भंडारा - भंडारा Bhandara जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे भंडारा जिल्हावासिय आपले आरोग्य सुदृष्ठ ठेवण्यासाठी आता चक्क औषधी वनस्पती medicinal plants कडे वळले असून इम्युनिटी Imunity वाढनाऱ्या औषधी वनस्पतिच्या रोपांच्या खरेदीसाठी भंडारा जिल्हावासियांची नर्सरी Nuresary कडे झुंबड करत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवाय जिल्ह्यात औषधीवनस्पतीच्या रोपांची खरेदी ही वाढली आहे.  Bhandara district residents turned to medicinal plants

संपूर्ण देशात कोरोनाने प्रचंड थैमान घातले असून भंडारा जिल्ह्यात तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरक्षा: हाहाकार माजविला आहे. दररोज मृतांची आकडेवारी ही भंडारा जिल्हावासीयांमध्ये दहशत माजविणारी ठरली आणि त्यातूनच मार्ग काढत आता जिल्हावासी चक्क आयुर्वेदाकडे वळले आहे. आता इम्युनिटी वाढवण्यासाठी चक्क औषधी वनस्पती खरेदी कडे वळले आहे आणि त्यांच्याच परिणाम म्हणुन जिल्ह्यातील नर्सरी मध्ये औषधी वनस्पतीची मागणी वाढली आहे. यात अश्वगंधा,शेवगा, शतावरी, गुडवेल, अडसुळा,लेंडी पिंपरी, मूसली,खंडू चक्का आणि वड-पिंपल अशा इम्युनिटी व ऑक्सीजन देणाऱ्या रोपंची अनेकांकडून मागणी वाढली आहे. औषधी वनस्पती चे रोपटे खरेदी करण्यासाठी नर्सरी मध्ये भंडारावासीय गर्दी करताना दिसत आहे.

हे देखील पहा -

भंडारा जिल्ह्यात 2 शासकीय व 1 खाजगी नर्सरी असून सुरुवातीला रस्त्याच्या कडे लावनारी झाड़े, फळ झाड़े व फूल झाड़े यांची मागणी असल्याने नर्सरी मालक ही झाड़े मोठ्या प्रमाणात लावत होती,मात्र आताऔषधी वनस्पती  रोपाची  मागणी वाढल्याने आता जिल्ह्यातील नर्सरी मालक औषधी वनस्पती रोप आपल्या नर्सरी मध्ये लावत आहेत. यात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर प्रख्यात येरने नर्सरी मालक यांनी 2 लाख इतर रोपांबरोबर 30 हजार औषधी वनस्पती   रोपंची लागवड केली आहे. Bhandara district residents turned to medicinal plants

सुरुवातीला 20 ते 30 औषधी वनस्पती रोपटे महिन्याभरात विकले जायची आता चक्क 300 ते 400 रोपटे विकले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय भविष्यत ही संख्या वाढणार असल्याचे ते सांगतात. एकंदरीत वाढता कोरोनाचा प्रभाव,खर्चिक उपचारानंतर औषधांचा परिणाम बघता आता येणाऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये जिल्हावासीय आयुवैदाला महत्व देत असल्याचे दिसत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com