साकोलीत आयपीएलवर सट्टा; एकाला अटक

अभिजित घोरमारे
सोमवार, 3 मे 2021

भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरातील प्रगति कॉलनी येथे मुंबई विरुद्ध चेन्नई या आयपीएल क्रिकेटवर सट्टा साकोली पोलिसांनी धाडी टाकत एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे

साकोली : भंडारा जिल्ह्याच्या साकोली Sakoli शहरातील प्रगति कॉलनी येथे मुंबई Mumbai विरुद्ध चेन्नई Chennai या आयपीएल क्रिकेटवर IPL Cricket सट्टा साकोली पोलिसांनी धाडी टाकत एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे. Bhandara Police Arrested one for IPL Betting

पंकज हेमराज मूंगुलमारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपिचे नाव असून तुमसर येथील बाबा नामक आरोपी फरार झाला आहे. सध्या कोरोना काळ सुरु असून जनतेच्या सुरक्षतेबरोबर अवैध धंद्यावर ही साकोली पोलिसांची करडी नजर असून त्याच्या बंदोबस्त करण्यात पोलिस तयारीत आहेत. अशाताच साकोली शहरात प्रगति कॉलनीत एका घरात 'मुंबई विरुद्ध चेन्नई'या आयपीएल क्रिकेटवर सट्टा Betting सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

त्या आधारे सापला रचत छापा टाकला असता आरोपिी पंकज ह्याला अटक केली असून दुसरा आरोपी बाबा फरार झाला आह. केलेल्या कारवाईत पाच मोबाइल, टीव्ही, चार्जर, असा १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा नोंदविला केला असून फरार आरोपीच्या शोधात पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. 
Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live