काळाची गरज ओळखून भारती हॉस्पिटलने उभा केला स्वतःचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट

oxygen sangli
oxygen sangli

सांगली -  कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. यंदा महाराष्ट्रात Maharashtra तर कोरोनाने कहर केला असून उपचारा अभावी अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. सांगली Sangli जिल्ह्यात दिवसेंदिवस  कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. Bharti Hospital set up its own liquid oxygen plant

जिल्हयात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा Oxygen तुटवडा जाणवत आहे. काळाची गरज ओळखून भारती हॉस्पिटलने Bharti Hospital स्वतःचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट liquid oxygen plant  उभा केला आहे. तब्बल 19 टन ऑक्सिजन या ठिकाणी साठवण केली जात असल्याने हॉस्पिटलमध्ये Hospital ऑक्सिजन कमतरता भासत नाही. 

हे देखील पहा -

सांगली जिल्ह्यात 40 ते 45 टन ऑक्सिजनची गरज आहे. तर साधारणपणे शासकीय आणि खाजगी अशी 73 कोरोना हॉस्पिटल जिल्ह्यात आहेत. तर जिल्ह्यात कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपला जीव सुद्धा गमावला आहे. याच ऑक्सिजनची कमतरता पाहता सांगलीच्या भारती हॉस्पिटलने स्वतः चा ऑक्सिजन प्लांट उभा करून तो जास्तीत जास्त वाढवण्याचं काम सुरू केले आहे.Bharti Hospital set up its own liquid oxygen plant

यालिक्विड ऑक्सिजन प्लांटची  क्षमता 6  टन ऑक्सिजन इतकी होती ती आता 13 टन वाढवण्यात आली आहे. बॅकअप साठी जम्बो सिलिंडरचा बॅकअप आहे.  त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन तुटवडा जाणवत नाही. इतर हॉस्पिटलमध्ये ही अश्या उपाययोजना केल्या तर ऑक्सिजन कमतरता भासणार नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com