भास्कर जाधवांची  निकालापूर्वीच मिरवणुकीची तयारी ! 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

गुहागर :  या वेळी शिवसेनेचे भास्कर जाधव व राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर या दोघांच्यात चुरशीची लढत झालेली असल्याने कोण जिंकणार, कोण हरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

निकालाआधीच महायुतीकडून विजयाच्या मिरवणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितल्याचे वृत्त आहे. 

 संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील निकालाबाबत सर्वांमध्येच कमालीची उत्सुकता आहे. गुहागर मतदारसंघाची मतमोजणी खेड तालुक्‍यातील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी 8 वाजता सुरू होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कुमार सोनोने यांनी दिली.

मतमोजणी कक्षात 17 टेबल मांडण्यात येणार आहेत. एकूण 23 फेऱ्यांमध्ये ही मोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर 3 अधिकारी, 1 ऑफिसर, पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक असणार आहेत. मतमोजणी पोलिंग बुथवाईज होणार आहे.

प्रत्येक फेरीची माहिती ध्वनीक्षेपकावरून प्रसारित करण्यात येणार आहे. वृत्तपत्र व इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष, टीव्ही., वायफायची सोय केली आहे. निवडणूक मतमोजणीसाठी पोलिस यंत्रणाही सज्ज आहे. प्रत्येक पक्षाला वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे.

मतदानानंतर गुहागर मतदारसंघात निकालाबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर व महायुतीचे भास्कर जाधव यांच्यात खरी लढत आहे.

Webtittle: Bhaskar Jadhav prepares for procession in advance!

संबंधित बातम्या

Saam TV Live