अध्यात्म व पुरोहितांचे गुरुवर्य पुरुषोत्तम गवांदे यांचे कोरोनाने निधन...

रोहिदास गाडगे
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

श्री क्षेत्र भिमाशंकर देवस्थानचे विश्वस्त व अध्यात्म व पुरोहितांचे गुरुवर्य म्हणुन ओळख असणारे, पुरुषोत्तम गवांदे वय 77 यांचे आज कोरोनामुळे निधन झाले

पुणे : श्री क्षेत्र भिमाशंकर देवस्थानचे विश्वस्त व अध्यात्म व पुरोहितांचे गुरुवर्य म्हणुन ओळख असणारे, पुरुषोत्तम गवांदे Purushottam Gawande वय 77 यांचे आज कोरोनामुळे Corona निधन Dead झाले आहे.  त्यांच्या मागील ६ दिवसापासुन पुण्यातील Pune खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे दुखद निधन झाल्याने भिमाशंकर परिसरात शोककळा पसरली आहे. Bhimashankar Trustee  Purushottam Gawande Passed Away

मागील वर्षभरापासुन कोरोना महामारीच्या Corona Pandemic संकट काळात भिमाशंकर Bhimashankar परिसरातील आदिवासी भागातील डोंगराळ भागात अनेकांना मदतीचा हात देणारा हात आज कोरोनाच्या महामारीत हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुरुपोत्तम गवांदे यांनी शिक्षक Teacher म्हणुन काम करत असताना अनेक विद्यार्थी घडवले, शिक्षणाच्या आध्यत्माचे धडे देत असताना शिक्षकांचे आधारस्तंभ म्हणुन ओळखले जात

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त म्हणुन त्यांनी काम पाहिले देवस्थानच्या प्रत्येक उत्सव कार्यक्रमात त्यांना महत्वाचा वाटा होता. Bhimashankar Trustee  Purushottam Gawande Passed Away

देवस्थान व परिसरातील विकासाकामांकडे बारकाईने लक्ष देऊन करण्यात प्राधान्य देत होते. भिमाशंकर परिसरातील वनस्पती व महादेव वन यावर चांगला अभ्यास होता. जंगली वनस्पती,औषधांचे त्यांचे आधिक ज्ञान आदिवासी नागरिकांना मार्गदर्शन होते.

Edited by- digambar jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live