भिमाशंकरला षष्ठी ते नवमी असा सात दिवसांचा महारुद्र सुहाकार साधेपणात सुरु.. 

रोहिदास गाडगे
मंगळवार, 4 मे 2021

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकरला षष्ठी ते नवमी असा सात दिवसांचा महारुद्र सुहाकार, हवन, किर्तन प्रवचन जागर अन्नदान मोठा सोहळा भिमाशंकरला होत असतो. मात्र, मागील वर्षापासुन महारुद्र सुहाकार सोहळ्यावर निर्बंध आले आहे

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकरला Bhimashankar षष्ठी ते नवमी असा सात दिवसांचा महारुद्र सुहाकार, हवन, किर्तन प्रवचन जागर अन्नदान मोठा सोहळा भिमाशंकरला होत असतो. मात्र, मागील वर्षापासुन महारुद्र सुहाकार सोहळ्यावर निर्बंध आले आहे. Bhimashankar's seven-day Maharudra Suhakar begins in simplicity ..

पन्नास वर्षापासुन चालत आलेली परंपरा खंडीत पडु नये, यासाठी  पुजारी व गुरव यांच्या मर्यादित लोकांच्या उपस्थितीत दिवसरात्र प्रत्येक दोन तासांनी शिवलिंगावर Shivling महारुद्र सुहाकार पठण साधेपणाने सुरु आहे.  मात्र या सोहळ्याला भक्तांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.  

हे देखील पहा - 

मागील वर्षभरापासुन भाविकांना श्री क्षेत्र भिमाशंकरला परंपरेनुसार विविध सण, उत्सव, महाभिषेक सोहळे पार पडत आहे अशा षष्ठी ते नवमी दरम्यान पार पडणाऱ्या महारुद्र सुहाकार सोहळा भिमाशंकरला पार पडत असताना परंपरेनुसार पठण,हवण नित्यनियमाने सुरु आहे. Bhimashankar's seven-day Maharudra Suhakar begins in simplicity ..

आदिवासी बांधवाना आता कोरोनाची माहिती मिळणार कोरकू भाषेतून

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकरला महारुद्र सुहाकार सोहळ्याला देशभरातुन लाखो भाविक सहभागी होत असतात या सोहळ्यादरम्यान प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते मात्र यंदाही या सोहळ्यावर कोरोना Corona महामारीचे संकट असल्याने मर्यादित पुजारांच्या  उपस्थीत सोहळा पार पडत आहे.

Edited By- Digambar Jadhav 

 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live