BHR आर्थिक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी सकाळी 6 वाजता धुळे, जळगाव, औरंगाबाद, जामनेर, भुसावळ व अंमळनेर येथे धडक कारवाई केली.
गुन्हे शाखेची धडक कारवाई
गुन्हे शाखेची धडक कारवाई Saam Tv

सागर आव्हाड

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी सकाळी 6 वाजता धुळे, जळगाव, औरंगाबाद, जामनेर, भुसावळ व अंमळनेर येथे धडक कारवाई केली. पोलिसांच्या 15 टिमने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या या कारवाईमध्ये 12 मोठ्या व्यक्तीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली. In BHR fraud case Financial Crime Branch take Action

हे देखील पहा -

भागवत भंगाळे (जळगाव), छगन झालटे, जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भूसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोहार (जामनेर), प्रीतिश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद),जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रमोद किसनराव कापसे (अकोला) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याची नावे आहेत. तर प्रेम नारायण कागोटा (पुणे) यास पुण्यातील होटेल रिटझ कार्लटन येथून ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेची धडक कारवाई
पालघर मधील फटाके कंपनीत भीषण स्फोट

ताब्यात घेतलेल्यामध्ये जामनेर पंचायत समितीच्या माजी सभापतीसह, जळगावातील मद्यव्यावसायिक भागवत भंगाळे यांचा समावेश आहे. ताब्यात घेतले असून पोलिसांकडुन त्यांना स्थानिक पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यांच्याकडे दिवसभर चौकशी सुरु राहणार असल्याचे नवटके यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com