भुजबळ स्वतः मतदानापासून वंचित 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या स्वतःच्या येवला मतदारसंघात आणि मुलगा पंकज यांच्या नांदगाव मतदारसंघात आज तीव्र चुरस पहायला मिळाली. त्यामुळे भुजबळांनी दिवसभर दोन्ही मतदारसंघातील मतदान केंद्र पिंजून काढले. मतदारांच्या गाठीभेटी घेत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. या सर्व धावपळीत त्यांना नाशिक शहरात स्वतःचे मतदान करण्यासाठी मात्र येता आले नाही.

त्यामुळे स्वतःचा मतदारसंघ येवला, मुलगा पंकज यांचा मतदारसंघ नांदगाव या दोन्ही ठिकाणी यंदा शिवसेनेचे मोटे आव्हान आहे. ही चुरस मतदानातही पहायला मिळाली. त्यामुळे ते दोन्ही मतदारसंघात प्रत्येक केंद्रावर जाऊन मतदारांना भेट होते. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत होते. त्यांचे स्वतःचे मतदान नाशिक पश्‍चिम मतदारसंघात आहे. मतदारसंघातच तळ ठोकून राहिल्याने त्यांना तेथे येता आले नाही. त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहिले.  

मतदारांना मतदानासाठी आवाहान करणारे भुजबळ स्वतः मतदानापासून वंचित राहिल्याची चर्चा शहरात रंगली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे स्टार प्रचारक, आघाडीचे नेते आहेत. त्यांमुळे त्यांना राज्यभर प्रचार कारावा लागतो. यंदाही त्यांनी राज्यात विविध मतदारसंघांत सभा घेतल्या. जिल्ह्यातील सगळ्या मतदार संघातील प्रचारावर लक्ष ठेवतांना त्यांनी राज्यात काही सभा घेत प्रचार केला. पक्षासाठी मत मागितले. यंदा भाजप- शिवसेना सत्तेत असल्याने त्यांनी आपल्या सर्वच उमेदवारांना बळ दिले. 

सिडकोत शुकशुकाट

नाशिक पश्‍चिम मतदार संघातील सिडको भागातील ग्रामोदय मतदान केंद्रावर त्यांचे व भुजबळ कुटुंबियांचे मतदान आहे. दरवेळी सकाळी मतदान करुन दौऱ्यावर निघणारे भुजबळ व त्यांचा परिवार आज मात्र मतदानासाठी फिरकलाच नाही. सकाळपासून भुजबळ मतदान करतानाची छबी टिपण्यासाठी छायाचित्रकारांसह चॅनलचे प्रतिनिधी लक्ष ठेउन होते. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते भुजबळ यांच्या आगमनाकडे लक्ष ठेऊन होते. येवल्यात गर्क असल्याने सायंकाळी सहापर्यत पोहोचणार कसे? या प्रश्‍नाने कार्यकर्ते चिंतेत होते. अखेर मतदानाला ते आलेच नाहीत.

WebTittle :Bhujbal deprived himself of the vote

संबंधित बातम्या

Saam TV Live