सिनेमागृहात सिनेमा पाहायला मिळणार का ? मोठ मोठे सिनेमे OTT वर

ott platform
ott platform

मुंबई - सिनेमा Movie हा नेहमी सिनेमागृहात पाहावा हे वाक्य प्रत्येक सिनेमा प्रेमी नेहमी बोल्याचा. पण आता हे वाक्य चुकीचे ठरले आहे. एवढंच नव्हे तर प्रत्येक कलावंत नेहमी आपल्या चाहत्यांना सिनेमा सिनेमागृहात Theater जाऊन पाहा अस आवाहन ही करायाचा पण आता मात्र कोणत्याही कलाकार Actor हे वाक्य बोलताना दिसत नाही कारण आता ही परिस्तिथी बदलली आहे. Big big movies on OTT

कोरोना corona आणि लॉकडाऊनमुळे Lockdwon सिनेसृष्टीचं संपूर्ण चित्र  बदलले आहे. सिनेमागृह बंद असल्यामुळे मागच्या वर्षी अनेक मोठ मोठ्या कलाकारांनी आपला सिनेमा हा OTT वर प्रदर्शित केला आणि घरी बसून लोकांना सिनेमे पाहता आले.

हे देखील पहा -

या मध्ये बिग बी अमिताभ बच्चन Amitabh Bachchan आणि आयुष्यमान खुराना यांचा सिनेमा गुलाबो सिताबो असो किंवा विद्या बालनचा सिनेमा शकुंतला देवी हा सिनेमा असो किंवा संजय दत्त आणि आलिया भट्ट यांचा सडक सिनेमा असो. हे सर्व सिनेमे २०२० ला सिनेमागृहात येणार होते मात्र लॉकडाऊनमुळे हे सिनेमे  OTT  वर सिनेमाच्या निर्मात्यांना आणावे लागले. Big big movies on OTT

पण 2021 ला ही परिस्तिथी बदलेल असं सर्वांना वाटलं होतं.पण कोरोनाची दुसरी लाट आली आणि सिनेसृष्टीची परिस्थिती बदलली नाही. आता तर बाॅक्स ओफिसचा  सुलतान सलमान खानने सुधा शेवटी आपला राधे सिनेमा  हा OTT वर प्रदर्शित करूण टाकला.

जे सिनेमे मागच्या वर्षांपासून सिनेमागृह उघडण्याची वाट पाहत होते त्यांनी ही आपला सिनेमा OTT वर प्रदर्शित करण्याचा ठरवलं आहे. या मध्ये बहुचर्चित 83 या सिनेमाचाही समावेश आहे. खर तर कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा २०२०च्या जुन महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता मात्र लाॅकडाऊन असल्यामुळे रणवीर सिंग आणि कबिर खान यांनी हा सिनेमा पुढे ढकला पण आता असे  कळत आहे की हा सिनेमा OTT वर प्रदर्शित करण्याची चर्चा सध्या सुरु आहे.Big big movies on OTT

खर तर आता वाट आहे ती म्हणाजे रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्या सुर्यवंशी सिनेमाची गेल्या वर्षांपासून या सिनेमाची वाट संपूर्ण भारत पाहतो आहे. हा सिनेमा सिनेमागृहात पाहिला मिळेल हे खिलाडी कुमार आणि रोहित शेट्टी यांनी सांगितले तर आहेच मात्र जर ही परिस्तिथी बदली नाही तर हा ही सिनेमा OTT वर आणावा लागेल अशी ही चर्चा सध्या सिनेसृष्टी रंगतेय आणि जर हे झालं तर 70mm चा पद्दा कधी तरी उगडेल का हा प्रश्न उभा राहिल आहे. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com