पुणेकरांची खरेदीसाठी उसळली मोठी गर्दी... 

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 2 जून 2021

साधारण दीड- दोन महिन्यांच्या नंतर दुकाने आजपासून 'अनलॉक' झाली आणि शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी सर्वत्र पसरली आहे.

पुणे : साधारण दीड- दोन महिन्यांच्या नंतर दुकाने  'अनलॉक' Unlock झाली आणि शहरातील बाजारपेठांमध्ये Market मोठ्या प्रमाणात सर्वत्र गर्दी पसरली आहे. दुकानांची स्वच्छता आणि पूजन करून व्यावसायिकांनी पुन्हा एकदा हरिओम केल आहे. खरेदीसाठी निर्धारित वेळ उपलब्ध असल्याने पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आहे. Big crowd for shopping in Pune

लक्ष्मी रस्त्यावर अनेक दुकानांमध्ये सॅनिटायझर Sanitizer, थर्मल गनची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक दुकानांबाहेर रांगोळ्याही काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर बहुतांश ठिकाणी ग्राहकही रांगेत थांबून सुरक्षित अंतराचे नियम Rules पाळत असल्याचे दिसून आले आहे.

लॉकडाउनच्या विरोधात सोलापूर महापालिकेसमोर व्यापाऱ्यांचे आंदोलन...    

व्यावसायिकांनी पेढे, गुलाबपुष्प देऊन ग्राहकांचे स्वागत करत आहेत. दोन महिन्यांपासून खरेदी करता न आल्याने सकाळपासूनच पुणेकरांनीही खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये धाव घेतली आहे. कपडे, पादत्राणे, कटलरी, बल्ब- ट्युबसारख्या इलेक्ट्रिकल वस्तूंची खरेदी, इस्त्री-गिझर-मिक्सर सारख्या उपकरणांची दुरुस्ती त्याचबरोबर मोबाइल Mobile फोनसह, कम्प्युटर, लॅपटॉपची खरेदी-दुरुस्तीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. Big crowd for shopping in Pune

हे देखील पहा 

शहरात सध्या दररोज हजेरी लावणाऱ्या पावसामुळे छत्री, रेनकोट आणि पावसाळी साहित्यालाही मागणी वाढत आहे. लॉकडाउनच्या Lockdown काळात सराफांच्या दुकानातच अडकून पडलेले दागिने ताब्यात घेण्यासाठी सराफा दालनातही लगबग दिसून येत आहे. सलून आणि ब्युटी पार्लरला परवानगी दिलेली नसतानाही शहराच्या गल्लीबोळापासून ते मुख्य रस्त्यांवरही ते सुरू असल्याचे दिसून आले आहे. या भागातील बाजारपेठांमध्ये,दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live