रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार 'बडे मासे' मोकळेच..!

Remdisivir
Remdisivir

अकोला : कोरोनावर Corona संजीवनी समजल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर Remdisivir इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार पोलिसांच्या Police कारवाईतून समोर आलाय. जिल्ह्यात यामाध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल केली जात असल्याची माहिती आहे. पोलिसांनी रॅमिडिसिव्हरचा काळाबाजार करणाऱ्या 19 जणांना अटक केलीय. Big Fish in Remdisivir Black Marketing are still at Large

या आरोपींकडून 46 इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. रेमडेसिवीरच्या या काळ्या बाजारात केवळ छोटे छोटे प्यादेच ताब्यात घेतले असून अद्याप मुख्य सूत्रधार असलेले बडे मासे मोकळेच असून त्यांच्यावर केव्हा कारवाई होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सद्यस्थितीत देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच रुग्णांच्या उपचारात उपयुक्त असणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. कोरोनाचा गैरफायदा घेत अनेक डॉक्टर, कर्मचारी, मेडिकल संचालक, औषधे एजन्सी रेमडेसीवीर इंजेक्शनची काळाबाजारी करून चढ्या दराने विक्री करत आहेत. Big Fish in Remdisivir Black Marketing are still at Large

700 ते 2 हजार दरम्यान मिळणारे रेमडेसिवीर काळ्या बाजारात तब्बल 20 ते 25 हजार रुपयांच्या पुढे मिळत आहे. रुग्णाच्या अत्यावश्यकतेचा फायदा घेत 'मागच्या दाराने' अमाप माया कमविण्याचे पातक घातले आहे. यासाठी विविध हॉस्पिटल, मेडिकल्स, एजन्सीच्या कर्मचारी स्टाफ पासून ते थेट आरोग्य प्रशासनातील अधिकाऱ्यांशी लागेबांधे असावेत.

त्याशिवाय रेमडेसिवीरचे गौडबंगाल खुल्या बाजारात चालविणे शक्य नसल्याची चर्चा मेडिकल लाईनमध्ये आहे. या काळाबाजार व साठेबाजीतून स्थानिक गुन्हे शाखेने पितळे उघडे पाडत आतापर्यंत तब्बल 19 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 46 इंजेक्शनसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या काळ्या बाजारात अद्यापही 'बडे मासे' मोकाट असून त्यांच्यावर केव्हा कारवाई होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. Big Fish in Remdisivir Black Marketing are still at Large

-- काळाबाजारी करणारे मेडिकल्स, हॉस्पिटल
या काळाबाजार प्रकरणात खाजगी हॉस्पिटल आणि मेडिकलचा समावेश रेमडीसीवीर इंजेक्शनच्या काळाबाजारात  असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. यामध्ये अद्यापही मोठे हॉस्पिटल व मेडिकल या कारवाईपासून दूर आहेत.

-- संचालक, डॉक्टरवर कारवाई केव्हा? 
रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या शहरातील विविध हॉस्पिटल मेडिकलवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेत. या हॉस्पिटल, मेडिकलच्या संचालक व डॉक्टरांच्या आशीर्वादाने व सहकार्याने इंजेक्शनचा काळाबाजार केला जात असल्याने त्यांच्या विरोधात कारवाई केव्हा ? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित केला जात आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com