दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात मोठा खुलासा, शेतकर्‍यांना किल्ला ताब्यात घ्यायचा होता

विहंग ठाकूर
गुरुवार, 27 मे 2021

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावरील हिंसाचाराबद्दल तीस हजार दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. २६ जानेवारीच्या दिल्ली हिंसा हि पूर्व नियोजित असल्याचा या चार्जशीट मध्ये म्हणाले आहे.

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी Republic Day दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला Tractor Rally हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान झालेल्या प्रकरणात पोलिसांनी Police २२ गुन्हे दाखल केले आहेत. दिल्लीत Delhi काही भागात शेतकरी आंदोलनाला Framer Protest त्या दिवशी हिंसक वळण लागले.Big revelation in Delhi Police chargesheet

पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवावे लागले. पण शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याच दरम्यान एका पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली शेतकरी अडकला. पण त्याचा जागेवर मृत्यू झाला होता.

हे देखील पहा -

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने  दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावरील हिंसाचाराबद्दल तीस हजार दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. २६ जानेवारीच्या दिल्ली हिंसा हि पूर्व नियोजित असल्याचा या चार्जशीट मध्ये म्हणाले आहे. दिल्ली पोलिसांनी 3,224 पेजचीची चार्जशीट कोर्टात दाखल केली आहे. लाल किल्ल्याला शेतकऱ्यांना नवीन प्रोटेस्ट साइट बनवायचे आहे, असे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. Big revelation in Delhi Police chargesheet

पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर सुनिल पाल चौकशीला हजर

लाल किल्ल्यावरून  तिरंगा हटवून  निशाण साहिब फडकवण्यासाठी मोठी रक्कम दिली जाणारा होती असे चार्जशीट मध्ये नमूद करण्यात आले आहे. नोव्हेंबर डिसेंबर मधेच हा  कट रचण्यात होता असा देखील आरोप करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर पंजाब हरियाणातून ट्रॅक्टर देखील खरेदी करण्यात आले होते.

Edited By- Shivani Tichkule
 


संबंधित बातम्या

Saam TV Live