बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्ट सहसंस्थापक पदाचा राजीनामा

साम टीव्ही
शनिवार, 14 मार्च 2020
  • बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्ट सहसंस्थापक पदाचा राजीनामा.
  • समाजसेवेसाठी दिला राजीनामा.
  • बिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या १२ झाली आहे. 

वॉशिंगटन : बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या सहसंस्थापक पदाचा राजीनामा दिला आहे. समाजसेवा करण्यासाठी बिल गेट्स यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला असला तरी ते मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासोबत सल्लागार म्हणून काम करीत राहणार आहेत. बिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या १२ झाली आहे. 

हे ही वाचा - Coronavirus | पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोना!

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि तांत्रिक सल्लागार बिल गेट्स यांनी आपला वेळ शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी द्यायचा आहे. यामुळे गेट्स यांनी संचालक मंडळाचा राजीनामा देण्याचा हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्टने दिली आहे. त्यामुळे गेट्स मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाले असून आता ते पूर्णवेळ सामाजिक कार्यात आपला वेळ घालवतील. १९७५मध्ये पॉल एलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती, त्यानंतर २००० पर्यंत त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी काम केले. 

हे ही वाचा - 'कोरोनामागे अमेरिकेच्या सैन्याचा हात?'

Webtitle - Bill Gates Steps Down from Board of Directors of Microsoft


संबंधित बातम्या

Saam TV Live