कांदा भिजला.. ऊस झोपला... बळीराजाचं कोट्यावधींचं नुकसान!

साम टीव्ही
सोमवार, 7 सप्टेंबर 2020
  •  
  • कांदा भिजला.. ऊस झोपला
  • कांदा पाण्यात भिजून खराब झाला
  • नाशिक, जळगावमध्ये शेतमालाचं नुकसान

एकीकडे राज्यात कोरोनाचं थैमान सुरु आहे, दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतंय. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात शेतमालाचं कोट्यवधींचं नुकसान होतंय.

महाराष्ट्रभर कोसळणाऱया पावसामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय. वादळी पावसाचा ऊस, मका, भुईमूग पिकाप्रमाणेचं कांद्याला देखील मोठा फटका बसलाय. मुसळधार पावसामुळे कांदा व्यापाऱ्यांच्या शेडमध्ये पाणी साचतंय, त्यामुळे साठवलेला कांदा पाण्यात भिजून खराब झालाय, तर गोण्यांमध्ये भरलेल्या कांद्यालाही पाणी लागल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय.

बाजरी, तूर, भुईमूगसारख्या पिकांना या पावसामुळे फायदा होणार असला, तरी अनेक ठिकाणी वादळी पावसामुळे उभी पिकं जमीनदोस्त झालीयेत. या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करतायत. नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय.

वादळी पावसानं फक्त शेतातल्या उभ्या पिकांचं नुकसान होत नाहीये. पावसामुळे पिकवलेला शेतमाल बाजारात नेणंही शेतकऱ्यांना मुश्किल झालंय. चाळीसगावात शेतमालाचा ट्रॅक्टर नदीत पलटून गेला आणि लाखोंचा माल पाण्यात वाहून गेला. हे पाहून शेतकरी बेशुद्ध होवून जमिनीवर कोसळला.

एकीकडे वादळी पावसानं शेतातली उभी पिकलं झोपलीयेत. तर दुसरीकडे शेतमाल बाजारात न्यायचा कसा असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या अस्मानी संकटात ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live