रुग्णालयातील कोविड बायोवेस्ट कचरा उठला नागरिकांच्या जीवावर  

dumping yard
dumping yard

गोंदिया - गोंदियात Gondia आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून कोरोनाचा Corona बायोवेस्ट Bio-waste कचरा लोकवस्तीला लागूनच असलेल्या मोक्षधाम परिसरातील खुल्या जागेवर बेवारस फेकून देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयातून Hospital निघणारा बायोवेस्टेज कचरा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. Bio-waste from the hospital should be disposed properly

जागोजागी पीपीई किट PPE Kit ,Hand Golves हॅण्डग्लोब्ज ,मास्क Mask उघड्यावर पडले असल्याचे दिसून येत आहे यामुळे नागरिकांना कोरोना होण्याचा धोका आणखी वाढला आहे. ऐवढेच नव्हे तर वादळ आला की हा कचरा हवेमुळे नागरीकांच्या घरात जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे असे असले तरी नगरपालिका प्रशासन Municipal administration नागरीकांच्या जीवाशी खेळत आहे असेच दिसून येत आहे.  

कोविड रुग्ण असलेल्या रुग्णालयांतून निघणारा पीपीई कीट, रुग्णांकरिता वापरण्यात येणारी विविध औषधे, मास्क, हॅण्डग्लोब्ज आदी बायोमेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणात बाहेर निघतो, त्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट Disposal लावणे अगत्याचे आहे. असे असताना मात्र तो बायोवेस्ट प्लास्टिकच्या पिशवीत टाकून सर्रास मोक्षधाम परिसरात असलेल्या पालिकेच्या अघोषित डम्पिंग यार्डमध्ये Dumping Yard टाकण्यात येत आहे. Bio-waste from the hospital should be disposed properly

या डम्पिंग यार्डला कसल्याही प्रकारचे कुंपण नाही किंवा सुरक्षा भिंत Security wall नाही,त्यामुळे हव्याची साधी झुळूक आली तरी, तो कचरा इतरत्र उडून जातो. परिणामी परिसरात वास्तव्यास असणाऱ्यांना देखील कोरोनाची Corona लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पालिका आणि शहरातील लोकप्रतिनिधी देखील बघत आहेत. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com