निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप आणि कॉंग्रेसचे हे नविन फंडे ...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 जानेवारी 2019

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराचा अनोखा फंडा वापरला आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून युवक कॉंग्रेसनेही वेगळी चाल खेळण्यास सुरुवात केली आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या 23 कलमी कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील  प्रत्येक बूथ वर 5 कमळ काढण्यात येत आहेत. भाजपला मतदान करणाऱ्या मतदारानी व करणार्यानी आपल्या घरावर भाजपचे झेंडे लावावेत तसेच प्रत्येक बुथवर पाच ठिकाणी कमळाचे फूल रेखाटण्याचा सूचना दिल्या आहेत. त्याचवेळी कॉंग्रेसने प्रत्येक प्रभागात जाउन सदस्य नोंदणी करण्याचा सपाटा लावला आहे.

भाजप समर्थक कार्यकर्त्यानी आपल्या घरावर कमळ कोरण्यास सुरुवात केली आहे तर युवक कॉंग्रेसने प्रत्येक प्रभागात जाऊन सदस्य नोंदणीचा उपक्रम सुरु केला आहे.

Web Title: Mera Ghar BJP ka Ghar BJP new campaign

संबंधित बातम्या

Saam TV Live