EXCLUSIVE | भाजप काँग्रेसला चालवतंय का?

साम टीव्ही
सोमवार, 24 ऑगस्ट 2020
  • अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये पेटला वाद
  • सुनिल केदारांनी ज्येष्ठांना सुनावलं
  • खरंच भाजप काँग्रेसला चालवतोय का?

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये असं नाराजीनाट्य सुरू असतानाच राज्यातही काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत. गांधी कुटुंबाच्या समर्थनासाठी तरूण नेतेमंडळी पुढे सरसावलीत.

पहा, सविस्तर विश्लेषण -

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सध्या पक्षात रान पेटलंय. एकाच व्यक्तीची अध्यक्षपदी नेमणूक करण्याऐवजी सामूहिक नेतृत्वाची मागणी काही नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून केलीय. त्यामुळे गांधी कुटुंबाचा बचाव करण्यासाठी निष्ठावंत मैदानात उतरलेत.

केदारांचा रोख पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्यावर आहे. एवढच नव्हे तर गांधी कुटुंबियांच्या पाठिशी उभं राहण्याची हीच वेळ असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलंय. केदारांच्या सुरात यशोमती ठाकूर आणि विजय वडेट्टीवार या तरूण तुर्कांनीही सूर मिसळलाय.

गांधी कुटुंबाच्या हातून पक्षाची सूत्रं निसटतायत की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती जेव्हा जेव्हा येते, तेव्हा गांधी कुटुंबाचे निष्ठावंत आपल्या छातीची ढाल करून बचावासाठी पुढे येतात, हे आजवर दिसलेलं चित्र यानिमित्ताने पुन्हा दिसलंय. पण हा वाद तरूण तूर्क विरुद्ध जुणे जाणते असा नसून त्याला राज्यातल्या सत्तेतल्या वाट्याचीही किनार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा संघर्ष पुढेही सुरू राहण्याची चिन्हं आहेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live