भाजपची चौथी यादी  जाहिर, रामराजे नाईक-निंबाळकरांच्या जावयाला भाजपचे तिकीट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

मुंबई :  भाजपने आज आपली चौथी यादी जाहीर केली असून, यामधूनही विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश महेता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली आहे. तर कुलाब्यामधून राज पुरोहित यांचा पत्ता कापून त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने एक प्रकारे त्यांचे पुनर्वसनच करण्यात आले आहे. 

राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत. ते 2016 मध्ये राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे आमदार हाेते. तसेच नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर 2009 ला मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हाेता.

दरम्यान, जावई एका पक्षात व ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर एका पक्षात अशी चर्चा सध्या सोशल मिडियात सुरु झाली आहे. 2014 च्या आधी नार्वेकर हे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते होते. त्यानंतर त्यांनी 2009 ला अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत लाेकसभा लढविली होता. 

आज सध्या भाजपचे वारे पाहता सर्वच पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्याप्रमाणे नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कुलाब्याचे तिकीट देखील मिळविले आहे. एकप्रकारे भाजपने नार्वेकर यांना तिकीट देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे.      

Web Title: BJP declares nomination to Rahul Narvekar in Kulaba for Maharashtra Vidhan Sabha electtions
 
संबंधित बातम्या

Saam TV Live