आता कोरोनाच्या युद्धातही केंद्र सरकार राजकारण करणार? सीएम ऐवजी पीएम फंडातच मदत करण्याची सक्ती

साम टीव्ही
शनिवार, 2 मे 2020
  • पीएम फंडातच मदत करण्याची सक्ती
  • सीएम फंडाला मदत करण्यास विरोध
  • अशाने कोरोनाशी युद्ध कसं जिंकणार?

कोरोनाशी लढण्यासाठी आर्थिक पाठबळ हवंय. जी अवस्था केंद्राची आहे, तिच अवस्था राज्याचीही आहे. त्यातच सीएम आणि पीएम फंडावरुन राजकारण पेटलंय. जालन्यातल्या भोकरदन आणि बदनापूर तालुक्यात याचाच प्रत्यय आलाय.

भाजपची सत्ता असलेल्या मतदार संघात अशी सक्ती होत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे या संकटात तरी राजकारण टाळा, अशीच संतप्त प्रतिक्रिया लोकांतून उमटतेय... कारण या लढ्यात आता घरी गरज आहे, ती एकत्रितपणे संकटाला सामोरं जाण्याची. इथेही राजकारण झालं, तर लोकांचा राजकारणावरचा उरला सुरला विश्वासही उठेल.

Web Title - bjp government Forced to help in PM fund instead of CM


संबंधित बातम्या

Saam TV Live