भाजप सरकारच्या योजना फेल - कॉंग्रेस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

मुंबई - समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात झालेल्या भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती आणखी एका महामार्गाच्या भूसंपादनात झालेली आहे. समृद्धीप्रमाणेच धुळे- सोलापूर या तीन हजार कोटी रुपयांच्या रस्ता चौपदरीकरणाच्या भूसंपादनातही असाच भ्रष्टाचार करून अधिकारी व दलालांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांची लूट केली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी केला.

वडेट्टीवार म्हणाले, की समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. मात्र या प्रकल्पाची रूपरेखा आखली जात असतानाच काही सरकारी अधिकाऱ्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या, नंतर त्या जमिनी सरकारलाच प्रचंड किमतीला विकून अधिकारी व दलालांनी उखळ पांढरे करून घेतले. त्याच पद्धतीने धुळे- सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या जमिनी काही राजकीय नेते, सरकारी अधिकारी यांच्या असून त्यांनी कोट्यावधींची लूट केली. धुळे- सोलापूर रस्ता चौपदरीकरणाच्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेत बीड जिल्ह्यातील हिरापूर ते रांजणी (ता. गेवराई) दरम्यान पाडळशिंगी गाव व परिसर येथे २०१७ मध्ये सुमारे सात किलोमीटरच्या रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात आले.

भूसंपादन करताना कागदोपत्री जास्त क्षेत्रफळ दाखवून ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हत्या अशा विहिरी, घरे, बांधकामे, झाडे, हॉटेल दाखवून अधिकारी व दलाल यांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांची लूट केलेली आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

Web Title: BJP Government Scheme Flop Congress Comment
 
संबंधित बातम्या

Saam TV Live