आधी लस जनतेला, मग स्वतःला - कल्याणच्या भाजप आमदाराची घोषणा

प्रदीप भणगे
रविवार, 25 एप्रिल 2021

आधी कल्याण पूर्वेत जनतेला लस देणार,मगच मी घेणार.तसेच मुलाच्या लग्नाचा खर्च हा जनतेच्या लसीकरणासाठी करणार आहे असे कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले आहे

कल्याण : आधी कल्याण पूर्वेत जनतेला लस देणार,मगच मी घेणार.तसेच मुलाच्या लग्नाचा खर्च हा जनतेच्या लसीकरणासाठी करणार आहे असे कल्याण पूर्व Kalyan East मतदारसंघातील भाजप BJP आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले आहे. Will Take Corona Vaccine After People of Constituency Vaccinated 

राज्यातील वाढत्या कोरोनाचा Corona धोका ओळखून कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड नागरिकांच्या हिताचा विचार करून एक करोड रुपये आमदार निधी मधून ऑक्सीजन प्लांट Oxygen Plant उभा करण्यासाठी दिले आहेत. विशेष म्हणजे आता भाजप आमदार गायकवाड यांच्या मुलाचे लग्न आहे.

हा लग्न सोगळा साधेपणाने करणार असून लग्नासाठी होणारा खर्च नागरीकांच्या लसीकरणासाठी करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच आधी कल्याण पूर्वेत जनतेला लस देणार, मगच मी लस घेणार असेही गायकवाड यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live