नवाब मलिक यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा - अतुल भातखळकर

साम टिव्ही ब्युरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

अफवा पसरवणारी व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अफवा पसरविल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या अतुल भातखळकर यांनी केली आहे

मुंबई : रेमडिसिवीर इंजेक्शन vaccine वरून केंद्र सरकार central government विरोधात अफवा पसरवणारी व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक nawab malik यांच्याविरोधात अफवा पसरविल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल  भातखळकर atul bhatkhalkar यांनी आज दिंडोशी पोलिस police ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. BJP Leader Atul Bhatkhalkar Demands to register offence against Nawab Malik

दोन दिवसांपूर्वी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने रेमडिसिवीर उत्पादक कंपन्यांनी  महाराष्ट्राला रेमडिसिवीर इंजेक्शन देऊ नये अन्यथा आपला परवाना रद्द करू अशी धमकी दिली असल्याची खोटी माहिती देऊन केंद्र व राज्य सरकारमध्ये state government नाहक वाद निर्माण करून राष्ट्रीय एकतेला तडा जाईल असे वक्तव्य केले, इतकेच नाही तर प्रसार माध्यम व समाज माध्यमातून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम केले, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

भीतीपोटी हजारो लोकांनी महाराष्ट्र सोडून जाण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती यातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवाब मलिक यांचे हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असून नवाब यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे. राज्य सरकारने ४८ तासांत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live