माजी राज्यमंत्री रमेश बागवे आमदार धीरज देशमुख यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही ?

दीपक क्षीरसागर 
सोमवार, 29 मार्च 2021

केंद्र सरकारच्या विरोधात लातूर (Latur) शहरात काँग्रेस (Indian National Congress) पक्षाच्या वतीने दि. २७ मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत रमेश बागवे व धीरज देशमुख यांच्या विरोधात गुन्हा का नोंद झाला नाही, अशी विचारणा भाजपा नेते व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे

 

लातूर : केंद्र सरकारच्या विरोधात लातूर (Latur) शहरात काँग्रेस (Indian National Congress) पक्षाच्या वतीने दि. २७ मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत रमेश बागवे व धीरज देशमुख यांच्या विरोधात गुन्हा का नोंद झाला नाही, अशी विचारणा भाजपा नेते व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे. BJP Leader Demands Registration of Offence Against Ramesh Bagve and Dheeraj Deshmukh

जिल्ह्यामध्ये दररोज कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत चालले असल्यामुळेच लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या आंदोलनकर्त्यावर पोलिसांच्या (Police) वतीने कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येऊन गुन्हा नोंद करण्यात आला. आंदोलनातील प्रमुख नेते माजी राज्यमंत्री रमेश बागवे व आमदार धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) यांच्या उपस्थितीत हे धरणे आंदोलन करण्यात आलेले होते. रमेश बागवे व धीरज देशमुख दोघेही इतर आंदोलकांसमवेत जवळपास  ५ तास धरणे धरून बसले होते.आमदार धीरज देशमुख आणि रमेश बागवे यांनी केंद्र सरकारच्या (Central Government) विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली. पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. 

आंदोलनकारांनी कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला आणि  घोषणा दिल्या. यासाठी कार्यकर्त्यांसोबत रमेश बागवे (Ramesh Bagwe) आणि धीरज देशमुख यांचेही नावे पोलिसांनी समाविष्ट करणे आवश्यक होते. परंतु इतर आंदोलकावरच गांधी चौक पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण काँग्रेसच्या आंदोलनातील प्रमुख नेत्यांना मात्र सोडण्यात आले आहे. या प्रमुख नेत्यांवर गांधी चौक पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा का दाखल केला नाही ? असा सवाल भाजपा (BJP)  नेते व्यंकटराव पनाळे यांनी केला आहे. BJP Leader Demands Registration of Offence Against Ramesh Bagve and Dheeraj Deshmukh

Edited by- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live