भाजप नेते कल्याण काळेंचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

साम टिव्ही ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

पंढरपूर (Pandhapur) विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (NCP) पंढरपूरचे भाजप (BJP) नेते कल्याणराव काळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला

सोलापूर: पंढरपूर (Pandhapur) विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (NCP) पंढरपूरचे भाजप (BJP) नेते कल्याणराव काळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. BJP leader Kalyan Kale joins NCP in presence of Ajit Pawar

यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रवेशाच्या सभेला मोठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सींग पार फज्जा उडाल्याचे दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा मुद्दा राजकीय वर्तुळात गाजत होता. पोटनिवडणुकीची धामधूम सुरू असताना काळे मात्र बार्शी तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्षबागांची पाहणी करत होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. त्यांनीही याबाबत सोयीस्करपणे मौन बाळगले होते.

त्यातच सोमवारी (ता. ५ एप्रिल) भारतीय जनता पक्षाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काळे यांची पंढरपुरात भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु काळे यांनी आज स्वतःच राष्ट्रवादी प्रवेशाचा वार आणि तारीख जाहीर केल्याने त्याबाबतच्या शक्यतांवर पडदा पडला आहे. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये कल्याण काळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन वर्षांपूर्वी काळे यांनी आपल्या साखर  कारखानदारीच्या अडचणी सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला होता. मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही.

Edited By - Sanika Gade

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live