भाजप नेते किरीट सोमय्या यांची रेवदंडा पोलीस ठाण्याला भेट......

दिनेश पिसाट
सोमवार, 3 मे 2021

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भ्र्ष्टचाराच्या आरोपाचे रान उठलं आहे

रायगड : भाजपचे BJP नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यात भ्रष्टाचाराच्या आरोपाचे रान उठलं आहे. रायगड Raigad जिल्ह्या मध्ये उद्धव ठाकरे यांनी कुटूंबासाठी नवे खरेदी केलेल्या कोर्लई येथील जमिनी संदर्भात किरीट सोमय्या यांनी काही महिन्यापूर्वी पोलीस तक्रार केली होती. BJP leader Kirit Somaiya visited Revdanda police station

या तक्रारीचे पुढे काय झाले, याच्या चौकशीसाठी किरीट सोमय्या रेवदंडा Revdanda पोलीस Police ठाण्यात आले होते. रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अशोक थोरात Ashok Thorat यांची त्यांनी भेट घेऊन तक्रारीची चर्चा केली. रेवदंडा पोलिसांनी अद्याप उद्धव ठाकरे  यांच्यावर एफ आय आर FIR दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. 

त्यावरती किरीट सोमय्या यांनी येत्या ७ दिवसात एफआयआर दाखल न झाल्यास , उच्च न्यायालयात High Court जाणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. यावेळेस त्यांनी या प्रकरणाची एस आय टी SIT मार्फत चौकशीची मागणी देखील केली आहे.  

Edited By- Digambar Jadhav

 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live