ठाणे जिल्हा बँकेत बविआ-भाजप प्रणित पॅनलची सत्ता.. 

BJP Led Panel Won Thane District Bank Election
BJP Led Panel Won Thane District Bank Election

डोंबिवली : सहकार पॅनेलने ठाणे (Thane) जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत बाजी मारली आहे. सहकार पॅनेलनं 21 पैकी 18 जागा जिंकल्या असून मतदारांनी शिवसेना-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या पॅनलचा दारुण पराभव केला आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर, भाजपाचे (BJP) खासदार कपिल पाटील (Kapil Patil) आणि आमदार किसन कथोरे यांनी मतदारांचे यावेळी आभार मानले. BJP Led Panel Won Thane District Bank Election

ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.दरवेळी प्रमाणे ठाणे महापालिका नगरसेवक बाबाजी पाटील बिनविरोध निवडून आले आहेत.जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रांवर निवडणूक (Election) प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्या महाविकास परिवर्तन पॅनलच्या प्रचारासाठी राज्याच्या मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) असे दोन मंत्री आले होते, परंतु त्याचा प्रभाव मतदानावर पडला नसल्याचे पाहायला मिळाले.

या निवडणुकीत चार फेऱ्यांमध्ये 91 टक्के मतदान झाले होते.त्यामुळे आता ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेच्या संचालक मंडळावर बविआ-भाजपचे वर्चस्व असेल. बहुजन विकास आघाडीला 9 भाजपा 7 व अन्य 2 असे सहकार पॅनलचे 18 उमेदवार विजयी झाले आहेत.शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्या महाविकास परिवर्तन पॅनलच्या 3 उमेदवार निवडून आले आहे. जिल्हा बँकेच्या निडणुकीत एकूण जागांसाठी 46 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं. 3062 मतदारांनी मतदान केले. BJP Led Panel Won Thane District Bank Election

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com