येत्या रविवारी भाजपमध्ये मोठ्य़ा प्रमाणावर मेगाभरती

येत्या रविवारी भाजपमध्ये मोठ्य़ा प्रमाणावर मेगाभरती

मुंबई - भाजपच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेची सांगता येत्या एक सप्टेंबरला सोलपूरला होणार आहे. याचे औचित्य साधून भाजपमध्ये या वेळी मोठ्या प्रमाणात मेगा भरती होणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे. अशाच प्रकारची मेगा भरती येत्या पाच आणि दहा सप्टेंबरलाही होणार आहे. 

लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांना खिंडारे पडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये आयारामांनी रांगा लावल्या आहेत. अनेक मातब्बर घराण्यांनी कमळ हाती घेतले असून, अनेक घराणी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुलाबाळांसह ‘वेटिंग’वर आहेत. 

भाजप आणि शिवसेनेने आयारामांना पायघड्या घालण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला आहे.  शिवसेनेने ‘मातोश्री’वर, तर भाजपने महाजनादेश यात्रेच्या दरम्यान इतर पक्षांतील ताकदवर नेत्यांना पक्षात सामावून घेण्याचा सपाटा लावला आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी जास्तीत जास्त पक्षप्रवेश करून घेण्याचा भाजपमधील चाणक्‍यांचा मानस आहे. त्यानुसार इच्छुक नेत्यांशी, विद्यमान लोकप्रतिनिधींशी बोलणी सुरू आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, सातारा जिल्ह्यातील नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सांगली जिल्ह्यातील सत्यजित देशमुख यांचा पक्षप्रवेश आगामी काळात होणार असल्याचे भाजपमधून सांगण्यात येते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार राणा जगजितसिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हे शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.


Web Title: BJP Mega Recruitment on sunday

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com