पहिल्यांदा शपथ घेणारे 'हे' सहा मंत्री घरी 

पहिल्यांदा शपथ घेणारे 'हे' सहा मंत्री घरी 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 च्या पहिल्या मंत्रीमंडळात सुरूवातीला 9 मंत्र्यांनी शपथविधी घेतला. मात्र यापैकी सहा मंत्री मागील पाच वर्षात घरी गेले. त्यामुळे आता पहिल्यांदा मंत्रीमंडळात सहभागी अनेकांची पाचावर धारण बसल्याचे चित्र आहे. 

2014 ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रीमंडळात 9 जणांचा शपथविधी करण्यात आला. यामधे अनुक्रमे एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

सर्वात प्रथम एकनाथ खडसे यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आला त्यानंतर प्रकाश मेहतांची गच्छंती करण्यात आली. दिलीप कांबळे, विष्णू सावरा व विनोद तावडे या विद्यमान मंत्र्यांना या विधानसभेसाठी उमेदवारीच दिली नाही. तर, पंकजा मुंडे यांचा निवडणूकीत दारूण पराभव झाला.

या पहिल्याचं मंत्रीमंडळातील सहा जणांची दांडी गुल झाल्याने नव्याने शपथविधी घेणार्यांची पाचावर धारण असल्याची चर्चा रंगली आहे. पहिल्या नऊ जणांपैकी केवळ चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंठीवार व विद्या ठाकूर यांचे स्थान अबादित राहिले आहे. 

दरम्यान, यावेळी युतीची सत्ता विराजमान करण्याचा निर्णय झाला तर भाजप सोबत शिवसेनेच्या मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. फडणवीस व ठाकरे दोघेही नऊ हा अंक शुभांक असल्याचे मानतात. त्यामुळे सुरूवातीलाच दोन्ही पक्षातील मिळून अठरा मंत्री शपथविधी घेतील असा दावा केला जात आहे. 

Web Title: BJP ministers in danger zone after take oath in Maharashtra
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com