लोक उगाच नाही, बेडसाठी रस्त्यावर फिरताहेत - गोपीचंद पडळकरांचा टोला

विजय पाटील
शनिवार, 17 एप्रिल 2021

मंत्री म्हणतात लोक रस्त्यावर विनाकारण फिरतात पण लोक बेडसाठी, व्हेंटिलेटर, इंजेक्शन साठी फिरत आहेत, कोरोना रोखण्यात सररकार अपयशी ठरले आहेच पण राज्य सरकारने गंभीर होऊन लोकांच्या या गरजा भागवणे गरजेचे आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली

सांगली : मंत्री म्हणतात लोक रस्त्यावर विनाकारण फिरतात पण लोक बेडसाठी, व्हेंटिलेटर, इंजेक्शन साठी फिरत आहेत, कोरोना रोखण्यात सररकार अपयशी ठरले आहेच पण राज्य सरकारने गंभीर होऊन लोकांच्या या गरजा भागवणे गरजेचे आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली ते सांगली मध्ये बोलत होते. BJP Mla Gopichand Padalkar Criticism on Government over corona 

सरकारने रेमडिसेवीर इंजेक्शन खाजगी दुकानांमध्ये विकणे बंद केले आहे.. त्यामुळे कोव्हिडं सेंटर शेजारी गर्दी होत आहे. एकीकडे सरकार मधील मंत्री लोक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे सांगत आहेत. कोरोनाची स्थिती भयानक झाली आहे. सरकार अपयशी ठरत आहे. लोकांना रेमडिसेवीर इंजेक्शन मिळत नाही, बेड नाहीत, ऑक्सिजन मिळेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व सेवा राज्य सरकारने जनतेला पुरवल्या पाहिजेत, असेही पडळकर म्हणाले.

पंढरपुरात पोट निवडणूक आहे. त्यासाठी आज मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणत होते की तिथे भावनिक लाट आहे. पंढरपुरात निम्मं मंत्री मंडळ होते. पण भाजपलाच जनतेचा कौल आहे, असाही दावा पडळकर यांनी केला.

Edited By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live