पोट निवडणुकीच्या प्रचाराला गेलेला भाजपचा आमदार निघाला कोरोना पाॅझिटिव्ह

BJP MLA From Latur Found Corona Positive After Election Rally
BJP MLA From Latur Found Corona Positive After Election Rally

लातूर : जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटक Karnataka राज्याच्या बिदर जिल्ह्यात सध्या विधानसभा पोटनिवडणुक Bi Election प्रचाराची धूम आहे. बसकल्याण Basavkalyan विधानसभा मतदारसंघाच्या आमदार बी. नारायण B. Narayan यांचे कोरोनामुळे निधन Dead झाल्याने ही पोट निवडणूक लागली आहे. BJP MLA From Latur found Corona Positive after Bawavkalyan Bi Election Campaign

मात्र, ज्या कोरोनामुळे आमदाराचे निधन झाले. त्या कोरोनालाच नजरअंदाज करून बसवकल्याण पोटनिवडणुकीत धुमधडाक्यात प्रचार सभा, रॅली, बैठकांना ऊत आला आहे. 

नेते, कार्यकर्ते आणि नागरिकही प्रचारात Election Campaign व्यग्र असून फिजिकल डिस्टनसिंग, मास्क चा अक्षरशः फज्जा उडाला, असून कोरोनाचा Corona संसर्ग होऊन अनेक जण कोरोनाबाधित होत आहेत. लातुर जिल्ह्यातील भाजपाचे BJP एक आमदार या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जाऊन आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यात सीमावर्ती भागात ये-जा करणारे नागरिकांची संख्या मोठी आहे. BJP MLA From Latur found Corona Positive after Bawavkalyan Bi Election Campaign

परिणामी कोरोनाचा हा धोका सीमा भागातून लातूर जिल्ह्यातील देवणी, निलंगा उदगीर उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यातील उमरगा Umarga या भागातील गावखेड्यात येत आहे. याशिवाय लातुर Latur जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कोरोनाचा मोठा उद्रेक उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्नाटकातून लातूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची सीमेवरच कोरोना चाचणी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com