उदय सामंत यांना 'गजनी रोग; नितेश राणे

अनंत पाताडे
सोमवार, 19 एप्रिल 2021

सिंधुदुर्गातील सरपंचांना विमा संरक्षण देऊ असे उदय सामंत यांनी जाहीर केले होते. परंतु, अद्याप निर्णय लागू झालेला नाही त्यावर आमदार नितेश राणे Nitesh Rane यांनी टिका केली आहे.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील सरपंचांना विमा संरक्षण देऊ असे उदय सामंत यांनी जाहीर केले होते. परंतु, अद्याप निर्णय लागू झालेला नाही त्यावर आमदार नितेश राणे Nitesh Rane यांनी टिका केली आहे. उदय सामंत Uday Samant यांना "गजनी रोग" झालेला आहे. पुढच्यावेळी त्यांच्या शरीरावर लिहून ठेवा जेणे करून ते  पालकमंत्री झाल्यापासून वर्षभरामध्ये काय काय बोलेत ते त्यांना आठवेल, असे नितेश राणे यांनी म्हणाले.BJP MLA Nitesh Rane Criticism on Uday Samant

राणे म्हणाले, "सामंत यांच्या असंख्य अशा घोषणा आहेत. पालकमंत्री तावातावाने अशा घोषणा करुन जातात. नंतर त्यांना कळतच नाही.नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच गावचे सरपंच स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता ग्रामीण भागात काम करत आहेत. सरकारचे काम हे करताहेत. प्रसंगी स्वतःच्या खिशात हात घालून कामे करताहेत. त्यांच्याबद्दल कुणीच विचार करत नाही. ५० हजारांचा विमा Insurance उतरविण्याच्या हेडलाईन तुम्ही मारणार. पण प्रत्यक्षात विमान उतरवणार कधी?,''

राणे पुढे म्हणाले, " जसे जम्बो कोविड सेंटरचे Covid Centre झाले तसाच हाच विषय आहे. सरपंच लोकांचं संरक्षण करत असतील तर सरपंचांचे संरक्षण कोण करणार? पालकमंत्री सातत्याने बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत. ते पिक्चरचे डायलाॅग मारताहेत असे वाटते. डायलॉग मारला तर लोक टाळ्या वाजवतील असे पालकमंत्र्यांना वाटते आहे. कला क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध आहे. मात्र, हा पिक्चर नाहीये ही खरी वस्तुस्थिती आहे. तुम्ही आमच्या आयुष्याशी खेळत आहेत. सरपंचांना संरक्षण देणार नसतील तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आवाज पोहोचवला जाईल."
Edited By Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live