ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन परिणय फुके आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली

अभिजित घोरमारे
बुधवार, 31 मार्च 2021

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार डाॅ. परिणय फुके आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसने कट रचून ओबीसी आरक्षण केल्याचा आरोप फुके यांनी केला आहे, दुसरीकडे भाजप नेते दुतोंडी असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.​

भंडारा : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे (BJP) आमदार डाॅ. परिणय फुके आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसने कट रचून ओबीसी आरक्षण केल्याचा आरोप फुके यांनी केला आहे, दुसरीकडे भाजप नेते दुतोंडी असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. BJP MLA Parinay Fuke and Nana Patole Allege one another over OBC Reservation

काँग्रेसने (Indian National Congress) कट रचून ओबीसी (OBC) आरक्षण कमी केल्याचा आरोप विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी केला आहे. 4 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court of India) न्यायाधीश खानविलकर यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार राज्यात 27 टक्के ओबीसी आरक्षण संपविण्यात आले आहे. याबाबतची मागणीची याचिका कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदार संघातील काँग्रस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य व भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.

एकीकडे ओबीसी च्या नावाखाली मते घ्यायची,तर दुसरीकडे मोठ- मोठे मोर्चे काढायचे, आंदोलने करायची आणि लोकांना सांगायचे की ओबीसी आरक्षण  कमी होऊ देणार नाही.  मात्र ओबीसी समाजाच्या विरोधात षडयंत्र रचून ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही, हा काँग्रेस पक्षाचा ढोंगीपणा असल्याच्या आरोप फुके यांनी केला आहे.BJP MLA Parinay Fuke and Nana Patole Allege one another over OBC Reservation

ओबीसी मंत्रालय काँग्रेसकडे असूनही सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारला याबाबत योग्य भूमिका मांडता आली नाही. याबाबत काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) आपले तोंड का उघडत नाही. काँग्रेस नेत्यांनीच ओबीसी आरक्षण संपविण्यासाठी याचिका दाखल केली असेल, तर हे काँग्रेस नेते बोलणार तरी कसे? असा सवालही डॉ. फुके यांनी विचारला आहे.

भाजप नेते दुतोंडी असून भाजप स्वत:च्या फायद्यासाठी ओबीसींचा वापर करत असल्याच्या आरोप नाना पटोले यांनी केले आहे. भाजप नेते ओबीसी जनगननेच्या विरोधात असून मागील बुधवारी सुरु असलेल्या लोकसभा अधिवेशनात ओबीसी जनगणनेनुसार जाहिर करण्याच्या प्रश्नाबाबत केंद्रसरकार ओबीसी जनगणना जाहिर करण्यास नकार दिला आहे.BJP MLA Parinay Fuke and Nana Patole Allege one another over OBC Reservation

फडणवीस सरकार(Devendra Fadanavis) च्या काळातओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप थांबल्या गेल्या आहेत.  याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे भाजपचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे असल्याच्या आरोप नाना पटोले यांनी केला आहे. विधानसभा अध्यक्ष असताना आपण ओबीसी जनगणने बाबत ठराव आणला गेला होता, असेही नाना पटोले यांनी सांगितले आहे. 

Edited By-Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live