भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण म्हणजे पोस्टरबॉय -  राजेश मोरे  

Saam Banner Template
Saam Banner Template

डोंबिवली : कचरा कर संकलन, अमृत योजनेतील कामे यावरुन सध्या भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण Ravindra Chavan यांनी शिवसेनेचे Shivsena पालकमंत्री एकनाथ शिंदे  Eknath Shinde व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांना लक्ष करीत आरोप करण्यास सुरुवात केली आहे. यावरुन डोंबिवलीतील Dombavali राजकारण ढवळून निघाले असताना सोमवारी शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे Rajesh More यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची Shivsena भूमिका मांडली.  BJP MLA Ravindra Chavan is a poster boy

यावेळी त्यांनी आमदार चव्हाण यांचा उल्लेख पोस्टरबॉय म्हणून केला असून पोस्टरबॉय प्रसिद्धीसाठी हे सारे काही करीत असल्याचा आरोप केला आहे. कोरोना काळात चार महिने कोकणात लपून बसणारे आमदार यांनी आपल्या कार्याचा पहिले अहवाल द्यावा त्यानंतर सेनेवर आरोप करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हे देखील पहा -

डोंबिवलीतील शिवसेना व भाजपामधील राजकारण आता चांगलेच तापले आहे. पहिले भाजप आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत खासदार शिंदे यांच्यावर तोफ डागली, त्यानंतर पालकमंत्री शिंदे यांच्याविरोधात शहरात बॅनर लावून नागरिकांचे लक्ष वेधले. याला उत्तर देण्याकरीता डोंबिवलीत शिवसेनातर्फे सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यात भाजपा आमदारांना कचरा संकलन कराच्या चर्चेतून सोडविता येणारा प्रश्न आमदारांनी चिघळवून ठेवला आहे. BJP MLA Ravindra Chavan is a poster boy

कचरा संकलन कराला सेनेचाही विरोध असून आमदारांनी त्याविषयी पालकमंत्र्यांसोबत चर्चा करायला हवी. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या या विषयाला त्यावेळेसच त्यांनी विरोध का केला नाही. अमृत योजनाही फडणवीस यांच्या काळात मंजूर झालेली मग ती कार्यान्वित करण्यासाठी आपण किती प्रयत्न केले असा सवाल मोरे यांनी केला. तसेच गेल्या अकरा वर्षात त्यातील तीन वर्षे मंत्रीपद असूनही डोंबिवलीसारख्या नगरीत एक तरी विधेयकाचे काम केल्याचे तुम्ही दाखवून द्या असे चॅलेंजच त्यांनी चव्हाणांना दिले.

भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली शहराला अस्वच्छ शहर म्हटले होते याचा उल्लेख सुद्धा पत्रकार परिषदेत शिवसेनेने केला आणि शहरातील कचरा कमी करण्यासाठी आमदारांनी काय केले असा प्रश्न शिवसेनेचे राजेश कदम यांनी यावेळी उपस्थित केला. आता याला भाजपा आमदार चव्हाण काय उत्तर देतात हे पहावे लागेल तसेच सेना भाजपामधील हे राजकारण कधीपर्यंत चालेल असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com