बीडच्या आष्टीत लॉकडाऊनच्या विरोधात आमदार सुरेश धस रस्त्यावर...

साम टिव्ही ब्युरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन विरोधात भाजप आमदार सुरेश धस आज सकाळी रस्त्यावर उतरले. आष्टी शहरातील बाजारपेठेत फिरून, त्यांनी व्यापाऱ्यांना दुकानं खुली करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जाहीर केलेला हा लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या मुळावर असून तात्काळ मागे घेण्यात यावा,  अशी मागणी करत भाजप आमदार सुरेश धस रस्त्यात उतरले

बीड : बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन विरोधात भाजप आमदार सुरेश धस आज सकाळी रस्त्यावर उतरले. आष्टी शहरातील बाजारपेठेत फिरून, त्यांनी व्यापाऱ्यांना दुकानं खुली करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जाहीर केलेला हा लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या मुळावर असून तात्काळ मागे घेण्यात यावा,  अशी मागणी करत भाजप आमदार सुरेश धस रस्त्यात उतरले. दरम्यान यावेळी मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळालं...! (BJP MLA Suresh Dhas Opposing Lock Down in Beed)

बीड (Beed) जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून पुढील दहा दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. पुढील दहा दिवस बीड जिल्ह्यामध्ये कडकडीत लॉकडाउन असणार आहे.  जिल्हाधिकारी रवींद्र जगतात यांच्याकडून अनेक वेळा सूचना देण्यात आल्या मात्र या सूचनांचं पालन होताना दिसलं नाही. त्यामुळं दररोज रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळाली. 

हीच रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज पासून ४ एप्रिल पर्यंत संचारबंदीचा निर्णय घेतलाय. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेताना व्यापाऱ्यांना विचारात घेतलं नाही असा आरोप करत ठरवून दिलेल्या वेळेत देखील दुकानं बंद ठेवली असून बेमुदत बंद पुकारला आहे. (BJP MLA Suresh Dhas Opposing Lock Down in Beed)

नांदेड (Nanded) जिल्ह्यात २४ तासांत एक हजार ५३ रुग्ण
जिल्ह्यात  गेल्या २४तासांत एक हजार ५३ नवे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. तर २४ तासांत ९ जणांचा म्रत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ८ हजार ३११ कोरोनाचे अँक्टीव्ह रुग्ण आहेत. तर ९३रुग्ण अतिगंभीर आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली असून, कोरोना नियमांचे पालन करा कोरोनाच्या साखळीला तोडा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live