BJP-MNS | मनसेच्या इंजिनला भाजपचं कमळ लागणार?

साम टीव्ही
रविवार, 24 जानेवारी 2021
  • मुंबई महापालिकेत नवी समीकरणांची जुळवाजुळव?
  • मनसेच्या इंजिनला भाजपचं कमळ लागणार?
  • प्रसाद लाड-राज ठाकरे भेटीमुळे चर्चांना उधाण

भाजप-शिवसेनेचा दोस्ताना तुटून बराच काळ लोटलाय.  त्यातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यायत. या निवडणुकीत भाजप कोणता नवा सवंगडी सोबत घेणार यावरून चर्चा सुरू असतानाच, भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतलीय. या भेटीमुळे महाराष्ट्रातील अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत.

राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजसमोर गाडीतून प्रसाद लाड उतरले आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या गेल्या. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलीय. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास खलबतं झाली. त्यामुळे, ही भेट आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठीची बेगमी आहे का? आणि शिवसेनेसोबत काडीमोड झालेल्या भाजपसोबत मनसे जाणार का? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेयत.

असं असलं तरी, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र भाजप-मनसेच्या युतीची चर्चा झाली. प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. त्याबाबत, आम्ही थेट मुंबईच्या महापौरांना गाठलं. तेव्हा त्या काय म्हणाल्या, पाहा हा व्हिडिओ -

 

त्याचसोबत, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनीही मुंबईकर शिवसेनेची साथ कधीच सोडणार नसल्याचा दावा केलाय.

शिवसेना आणि भाजपचा जुना दोस्ताना तुटून आता बराच काळ गेलाय. मधल्या काळात राजकीय पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकारही सत्तेत येऊन वर्षही लोटलं. त्यात आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यायत. त्यामुळे, शिवसेनेसोबत कोण कोण येणार? आणि भाजप कुणाला सोबत घेणार? या प्रश्नांची उत्तरं येणाऱा काळच सांगेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live