आघाडीच्या नेत्यांमुळेच आरक्षण रद्द : रावसाहेब दानवेंचा आरोप (व्हिडिओ)

Raosaheb Danve
Raosaheb Danve

जालना : महाविकास आघाडीतील Maha Vikas Aghadi नेत्यांमधील समन्वयाच्या अभावामुळेच मराठा आरक्षण Maratha Reservation कायदा सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्याचा आरोप केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांनी केला आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. BJP MP Raosaheb Danve Criticized Maha vikas Aghadi for Cancellation of Maratha Reservation

राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने सर्वोच्च न्यायालयात Supreme Court of India जे मुद्दे उपस्थित व्हायला हवे होते, ते मुद्दे उपस्थित झाले नाहीत, त्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण हा फक्त राज्याच्या अखत्यारीतील प्रश्न असून केंद्राचा आरक्षण प्रश्नात कोणताही सहभाग नाही,असंही सांगायला दानवे विसरले नाहीत. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकायलाच हवं होतं.मात्र ते टिकू शकलं नाही याला महाविकास आघाडीचे नेतेच जबाबदार असून राज्य सरकारवर मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

लातुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्य शासनाचा निषेध केला आहे. राज्य सरकार आरक्षण प्रश्नी योग्य भूमिका मांडण्यात अपयशी ठरले आहे. राज्य सरकारने आरक्षणासाठी जी ताकद लावायला हवी ती लावली नाही. समाजातील ५० युवकांनी बलिदान दिले आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. राज्य सरकारचा निष्काळजीपणा व भूमिका ही मराठा आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत ठरली असल्याचेही संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले आहे. BJP MP Raosaheb Danve Criticized Maha vikas Aghadi for Cancellation of Maratha Reservation

दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली आहे. मराठा समाजातील सत्तेमधील सरदाराच्या मुळे आरक्षण मिळाले नाही. राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात भक्कम पणे बाजू मांडता आली नाही, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी परत यायला हवे, असेही मत खोत यांनी व्यक्त केले
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com