भाजप खासदार उदयनराजेंची पक्षाच्याच नगरसेविकेवर कारवाईची मागणी

ओंकार कदम
शुक्रवार, 11 जून 2021

सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला केली फोन करून शिवीगाळ केलेला आॅडिओ व्हायरला झाला आहे. त्यावरुन उदयनराजेंनी कारवाईची मागणी केली आहे.  

सातारा : खासदार उदयनराजे भोसले Udayanraje यांनी भाजपच्या BJP नगरसेविका सिद्धी पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.  सातारा Satara नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे उदयनराजेंनी ही मागणी केली आहे. 

सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला केली फोन Phone करून शिवीगाळ केलेला आॅडिओ Audio व्हायरल झाला आहे. त्यावरुन उदयनराजेंनी कारवाईची मागणी केली आहे.  BJP MP Udayanraje Furious over Party Corporator in Satara

सध्या सातारा नगरपालिका ही कामापेक्षा इतर घडामोडीं मुळेच चर्चेत आली आहे. सातारा नगरपालिकेवर खासदार उदयनराजे यांची एक हाती सत्ता आहे. उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने नगरपालिकेचे बांधकाम सभापती पद हे भाजपच्या नगरसेविका सिद्धी पवार यांना दिले आहे. सध्या या नगरसेविकेची एक ओडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी ठेकेदाराच्या व्यवस्थापनाला फोनवरून जोरदार शिवीगाळ केल्याचे दिसते.

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले 'हे' आवाहन

प्रभागातील काम सुरू असताना एका अपार्टमेंट च्या पडलेली भिंत पुन्हा बांधण्यावरून नगरसेविका सिद्धी पवार यांनी अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली असा आरोप आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष उदयनराजे यांनी घेतली असून त्यांनी सिद्धी पवार यांच्यावर मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. BJP MP Udayanraje Furious over Party Corporator in Satara

नगरसेविका सिद्धी पवार यांनी स्वतःच्या बोलण्याचे समर्थन केले असून अधिकारी ऐकत नसल्याने मला अस बोलावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live