ममतांच्या शपथविधी वेळी भाजपचे देशव्यापी धरणे

वृत्तसंस्था
बुधवार, 5 मे 2021

पश्चिम बंगालमधील पराभवाने हादरलेल्या भाजपने ममता बॅनर्जी येत्या*5 मे रोजी जेव्हा, ऐतिहासिक रित्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्या वेळेस शपथ घेतील तेव्हा देशव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालमधील West Bengal पराभवाने हादरलेल्या भाजपने BJP ममता बॅनर्जी Mamata Banerjee आज (ता. ५ मे) रोजी जेव्हा, ऐतिहासिक रित्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्या वेळेस शपथ घेतील तेव्हा देशव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा J P Nadda यांना उद्याच बंगालमध्ये West Bengal जाण्यास सांगण्यात आले आहे. BJP Nation wide Agitation Today ahead of Mamata Banerjee Oath Ceremony

दुसरीकडे गेली अनेक वर्षे बंगालमध्येही दहशत पसरवणारे भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी आपल्या मूळ गावी, इंदोरमध्ये परत जावे, त्यांचे येथे काही काम नाही असा हल्लाबोल तृणमूल काँग्रेसचे TMC नेते, खासदार शौगत रॉय यांनी केला आहे. दरम्यान पश्चिम बंगाल मधील सध्याचे शासन हे केंद्र सरकारच्या ताब्यात आहे आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था त्यांनी सांभाळावी ही त्यांची जबाबदारी आहे असा पलटवार तृणमूल काँग्रेसने केला आहे.

विधानसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसचा विजय झाल्यावर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाची कार्यालय जाळली जात आहेत, भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले होत आहेत, महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार होत आहेत असा आरोप भाजपकडून केला जात आहे. तृणमूल काँग्रेसने हे सारे आरोप फेटाळताना भाजपला बंगाली जनतेने मुळापासून नाकारले आहे असा दावा केला आहे. भाजपचा सर्वेसर्वा नेतृत्वाला हे मान्य नाही. त्या पक्षाने मात्र देशव्यापी धरणे धरून पश्चिम बंगालच्या विजयाची जखम भळभळत ठेवण्याचा मानस व्यक्त केला आहे.
Edited By - Amit Golwalkar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live