VIDEO | राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी आज भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन

साम टीव्ही
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलसुद्धा उपस्थित राहणार आहेत. देशातील प्रमुख देवस्थानात शिर्डीचा समावेश असल्याने येथील आंदोलनावर प्रदेश भाजपने लक्ष केंद्रित केलंय. याशिवाय राज्यभर प्रमुख मंदिरांसमोर भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात येतंय.

राज्यातील प्रमुख देवस्थाने खुली करण्यासाठी भाजप पुन्हा आक्रमक झालीय. आज ठिकठिकाणी साधूसंत लाक्षणिक उपोषण करत असून, त्याला  भाजपने पाठिंबा जाहीर केलाय. पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य अतुल भोसले शिर्डी येथे उपोषण करणार आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलसुद्धा उपस्थित राहणार आहेत. देशातील प्रमुख देवस्थानात शिर्डीचा समावेश असल्याने येथील आंदोलनावर प्रदेश भाजपने लक्ष केंद्रित केलंय. याशिवाय राज्यभर प्रमुख मंदिरांसमोर भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात येतंय.

भाविकांसाठी मंदिरांचे दरवाजे अजूनही बंदच आहेत. त्याचं कारण म्हणजे हे सरकार कुंभकर्णी निद्रेत आहे. असा आरोप करणाऱ्या भाजपनं पुण्यात झोपी गेलेल्या या 'कुंभकर्ण रुपी सरकारला जागे करणारं' आंदोलन सुरू केलंय. सरकारची कुंभाकर्ण रूपी प्रतिमा तयार करण्यात आलीय. घंटानाद, शंखनाद, भजन, तुतारी अशी पारंपरिक वाद्य वाजवून या आधुनिक कुंभकर्णाला जागे करण्याचा प्रयत्न केला जातोय.

पाहा व्हिडिओ -

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक गोष्टी सुरू झाल्यात. मात्र धार्मिकस्थळं उघडण्यात आलेली नाहीत. त्यामुळे भाजपकडून मंदिरं उघडण्यासाठी जोर धरलाय. मुंबईत विधानपरिषध विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेते लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर परिसरात घंटानाद आंदोलन देखील करण्यात येणार आहे.  भाजपच्या घंटानाद आंदोनामुळे  परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय.

राज्यातील मंदिरं उघडी करावीत, या मागणीसाठी आज राज्यभर भाजपचे आंदोलन सुरू आहे. नागपूरातही वर्धा मार्गावरील साई मंदिरासमोर भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इतर राज्यात मंदिरं सुरू झाली आहेत. मात्र, महाराष्ट्रात अजूनही मंदिरं उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिरं उघडली जात नाही आहेत. त्यामुळं कोविड 19 चे नियम कडक करा, मात्र मंदिरं उघडी करा, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आलीय.

शिर्डीतील साईबाबांचं मंदिर उघडावे यासाठी समन्वयक आघाडीच्या वतीनं आंदोलनाला सुरूवात झालीय. शिर्डीतील ग्रामस्थांसह व्यवसायिक आंदोलनात सहभागी झालेत. शिर्डीत याआधी ग्रामस्थांनी मंदिर उघडावे म्हणून घंटानाद आंदोलन केले होतं.


संबंधित बातम्या

Saam TV Live