भाजपची सेनेला देणार  ११८ जागा 

 भाजपची सेनेला देणार  ११८ जागा 

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून शिवसेना-भाजपच्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शनिवारी रात्री चर्चा झाली. यात शिवसेनेने १३० जागांची यादी भाजपला दिली आहे. यातील ११८ जागांबाबत भाजपची कोणतीही हरकत नाही. त्यामुळे त्या जागांचा वाद संपलेला आहे. उर्वरित १२ जागांबाबत आता या दोन पक्षात खल सुरू आहे. दोन्ही पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या काही जागाची अदलाबदल करायची आहे. यात गोरेगाव, वांद्रे, चांदीवली, औसा आदी जागा आहेत.
 

मुंबईतील वडाळा, शिवाजी नगर- मानखुर्द, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर या जागांबरोबर विदर्भातील देवळी, रिसोड, गोंदिया तर पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल आदी जागांपैकी काही जागा शिवसेनेला हव्या आहेत. यातील शिवाजीनगर-मानखुर्दची जागा शिवसेनेला देण्यास भाजप तयार आहे. मात्र अन्य जागा सोडण्यास भाजप तयार नाही. या बारा जागांवर सध्या भाजप आणि शिवसेनेचे आमदार नाहीत.

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपात शिवसेनेने मागितलेल्या १३० जागांपैकी ११८ जागा देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र उर्वरित बारा जागांपैकी कोणत्या आणि किती जागा द्यायच्या यावर भाजपम आणि शिवसेनेमध्ये खल सुरू आहे. यात मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर-मानखुर्द, उल्हासनगर जागांचा समावेश आहे.

Web Tittle:: bjp ready to give 118 seats to shiv sena

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com