युतीच्या दारी सत्तेची दिवीळी

युतीच्या दारी सत्तेची दिवीळी

मुंबई -  राज्यातील सत्तेच्या राजगडावर आज भाजप-शिवसेना युतीने विजयाची दिवाळी साजरी केली खरी, पण भाजपचे ‘दोनशे वीस’पारच्या ‘महाजनादेशा’चे स्वप्न भंगले. राज्यभर फिरलेल्या शरद पवार नावाच्या ‘भुईचक्रा’ने विरोधकांच्या अंगणातही सामर्थ्याचे भुईनळे प्रज्वलित केल्याने महाआघाडी  शतकापर्यंत पोचली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर लावलेल्या लडीतील फक्त एकच फटाका वाजला, तर ‘एमआयएम’नेही तीन सुतळी बाँब फोडले. वंचित बहुजन आघाडीचे मात्र सगळेच फटाके फुसके निघाले.


ठळक वैशिष्ट्ये
कल्याण ग्रामीणमधून ‘मनसे’ने खाते उघडले
महायुतीमधील १९ आयाराम पराभूत
‘मातोश्री’च्या अंगणातच शिवसेनेचा पराभव
डहाणूमध्ये फडकला ‘माकप’चा लालबावटा
तुरुंगात असूनही रत्नाकर गुट्टे जिंकले
लातूरमध्ये देशमुखांच्या गढीवर आतषबाजी
बीडमध्ये संदीप क्षीरसागर ठरले जायंट किलर
आदित्य ठाकरे, रोहित पवारांचा युवा जोश
‘एमआयएम’चा पतंग उडाला
वंचित’चे सिलिंडर रिकामेच
बारामतीचा गड पुन्हा अभेद्यच
औरंगाबादेतील नऊ मतदारसंघांवर महायुती
‘शेकाप’चा अलिबागचा किल्ला ढासळला
पुण्यातही भाजपचे ‘शतप्रतिशत’चे स्वप्न भंगले
महायुतीला आधार मुंबई, ठाणे, कोकणचा
चार कॅबिनेट सहा राज्यमंत्र्यांचा पराभव
राज्याच्या राजकारणावर घराणेशाहीचे वर्चस्व
बड्या नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये ‘नोटा’ला मते
शिवसेना, राष्ट्रवादीच्या मतांचा टक्का वाढला
अजित पवार विक्रमी मताधिक्याने विजयी

महाराष्ट्रातील जनतेने ‘एनडीए’ला अत्यंत प्रेमाने आशीर्वाद दिला आहे. मतदारांनी पुन्हा एकदा पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही सतत काम करीत राहू. भाजपच्या आणि शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि आमच्या सर्व ‘एनडीए’ परिवाराच्या अथक परिश्रमाला मी सलाम करतो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: BJP-Shiv Sena alliance celebrated victory

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com