Breaking | Parbhani | पक्षविरोधी भूमिकेचा फटका नगराध्यक्षांवर भाजपची कारवाई

राजेश काटकर
बुधवार, 4 मार्च 2020
  • सीएएविरोधी ठराव करणाऱ्यांचं निलंबन
  • भाजपची नगराध्यक्षांविरोधात कारवाई
  • बाळासाहेब बोराडे, विनोद बोराडेंची हकालपट्टी

परभणी - सीएएच्या विरोधात ठराव पास केल्यामुळे परभणीच्या पालम नगरपरिषदेतील नगराध्यक्षांचं भाजपने निलंबन केलंय. पालम नगरपरिषदचे नगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे आणि सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद हरीभाऊ बोराडे यांच्यावर निलंबनाची कारवाई भाजपकडून करण्यात आली आहे.  सीएएविरोधात नगरपरिषदेत या दोघांनीही ठराव पास केला होता. त्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. 

हे ही पाहा - WEB विशेष | सरकारने का विकायला काढली LIC?

परभणी जिल्ह्यातील सेल नगरपालिका ही सध्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे. सेलू नगरपालिकेची दिनांक 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय सभा घेण्यात आली होती. अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत एक ठराव नगराध्यक्षांनी मंजूर केला होता. सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात असलेल्या या ठरावामुळे भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. यानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी या ठरावाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर नगराध्यक्षांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांना पक्षातून निष्कासित करण्यात आलं आहे. 

हे ही पाहा - अभिनेत्री स्वरा भास्कर सीएएविरोधात म्हणते की...

दुसरीकडे पालम नगर पंचायतीमध्ये शहर विकास आघाडीची सत्ता आहे. तर भाजपकडे पालमधील उपनगराध्यक्ष पद आहे. पालम नगर पंचायतीमध्येही 2 मार्चला अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेतदेखील सीएए विरोधात ठराव घेण्यात आला. यामुळे भाजपाचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने सीएएविरोधात ठराव घेऊन त्याचं समर्थन केल्यामुळे रोकडे यांनाही निष्कासित केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिकृत पत्र काढत दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. 

Video  #CAA आणि #NRC वर अमित शाहा यांचं मोठं स्पष्टीकरण

 

bjp suspends nagaradhyaksh for caa stand poliotics maharashtra chandrakant patil palam muncipal modi amit shah nagarpalika nagarparishad aghadi action


संबंधित बातम्या

Saam TV Live