धुळे महानगरपालिकेत भाजपला बहुमत, आघाडीचा उडवला धुव्वा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 डिसेंबर 2018

धुळे : महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचा धुव्वा उडवत भाजपने सरासरी 42 जागांवर विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. "एमआयएम'ने तूर्त चार जागांवर विजयी सलामी देत महापालिकेत प्रथमच प्रवेश केला आहे. भाजपने "मिशन फोर्टी प्लस'चा दिलेला नारा यशाकडे वाटचाल करत असल्याने विजयाच्या समीप असलेल्या उमेदवारांनी जल्लोष करण्यास प्रारंभ केला आहे. निवडणूक यंत्रणेने आतापर्यंत एकही अधिकृत निकाल जाहीर केलेला नाही हे विशेष. 

धुळे : महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचा धुव्वा उडवत भाजपने सरासरी 42 जागांवर विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. "एमआयएम'ने तूर्त चार जागांवर विजयी सलामी देत महापालिकेत प्रथमच प्रवेश केला आहे. भाजपने "मिशन फोर्टी प्लस'चा दिलेला नारा यशाकडे वाटचाल करत असल्याने विजयाच्या समीप असलेल्या उमेदवारांनी जल्लोष करण्यास प्रारंभ केला आहे. निवडणूक यंत्रणेने आतापर्यंत एकही अधिकृत निकाल जाहीर केलेला नाही हे विशेष. 

काही विजयी उमेदवारांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोषाचा प्रयत्न केला असता पोलिसांनी संभाव्य वाद टाळण्यासाठी सौम्य लाठीमार केला. 

कॉंग्रेस आघाडीला झटका 
महापालिकेत बारा वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. तिला सुरुंग लावण्यासाठी भाजपने या निवडणुकीत "फिफ्टी प्लस'चा नारा दिला. निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वावरून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनिल गोटे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. यात भाजपला नमोहरण करण्याचा विडा उचलत बंडखोर आमदार गोटे यांनी स्वतः स्थापन केलेल्या लोकसंग्राम पक्षातर्फे 59 उमेदवार रिंगणात उतरविले. या नेत्यांमधील वादात आपला लाभ होईल, अशी अटकळ कॉंग्रेस आघाडीचे नेते माजीमंत्री रोहिदास पाटील, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार कुणाल पाटील यांना होती. ती फोल ठरताना दिसते आहे. भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही गुंड उमेदवारांना प्रवेश दिला, असा प्रचाराचा प्रमुख मुद्या करत आमदार गोटे यांनी भाजप नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने ही निवडणूक राज्यात गाजली. आमदार गोटे यांना पुरून उरत तीन मंत्र्यांनी गोटे व कॉंग्रेस आघाडीला चांगलाच झटका दिल्याचे चित्र समोर येत आहे. 

विजयाची स्थिती 
महापालिका निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या स्थितीनुसार भाजपने सरासरी 42 जागांवरील विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रभाग क्रमांक 1, 4, 6, 7, 9, 10, 11, 14, 16, 17, 18 मध्ये भाजपचे उमेदवार विजयाकडे वाटचाल करीत आहेत. प्रभाग 15 मध्ये तीन जागा भाजपला मिळाल्या आहेत. उर्वरित एका जागेवर बसपाचा उमेदवार विजयी झाला आहे. प्रभाग 3 आणि 13 मध्ये "एमआयएम'च्या अनुक्रमे तीन व एका उमेदवाराने विजय संपादन केला. तेथे कॉंग्रेस आघाडीला झटका बसला. प्रभाग पाचमध्ये लोकसंग्राम पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार हेमा अनिल गोटे, राष्ट्रवादीचे कमलेश देवरे, भाजपचे भगवान गवळी, कृपेश नांद्रे विजयाकडे वाटचाल करत आहेत. प्रभाग आठमध्ये राष्ट्रवादीच्या विद्यमान महापौर कल्पना महाले व आघाडीच्या अन्य तीन उमेदवारांनी विजय मिळविला आहे.

महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी निवडणूक होत आहे. यात समाजवादी पक्षाच्या बिनविरोध एका महिला उमेदवारासह 355 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी रविवारी सरासरी 59.64 टक्के मतदान झाले. भाजपचे 62, शिवसेनेचे 50, कॉंग्रेसचे 21, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 53, लोकसंग्राम पक्षाचे 59, "एमआयएम'चे 12, "रासप'चे 12, समाजवादी पक्षाचे 12, मनसेचा एक उमेदवार आणि इतर अपक्ष रिंगणात आहेत. 

पक्षनिहाय जागा
भाजप 50
राष्ट्रवादी 09
काँग्रेस 05
समाजवादी 02
 शिवसेना 02
एमआयएम 02
लोकसंग्राम 01
अपक्ष 02 (एमआयएम)
एमआयएम एकूण 04

Web Title: BJP wins 40 plus in Dhule Municipal Corporation


संबंधित बातम्या

Saam TV Live