राज्य सरकारच्या बेरोजगारी धोरण विरोधात भाजपाचे आंदोलन

BJPs agitation against the state government's unemployment policy
BJPs agitation against the state government's unemployment policy

धुळे : राज्याच्या महाविकास आघाडी Mahavikas Aghadi सरकार तर्फे विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना देखील नोकर भरती करण्यात येत नाही. या विरोधामध्ये भाजपतर्फे BJP धुळे Dhule शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील क्युमाईन क्लब या ठिकाणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी निषेध आंदोलन Agitation करण्यात आले आहे. BJPs agitation against the state government's unemployment policy

कोरोनाच्या Corona संकट काळामध्ये रोजंदारी गमावलेल्या बेरोजगार युवकांसाठी राज्य सरकार पूर्णतः हतबल असल्याचा आरोप केला गेला आहे. राज्यामध्ये विविध क्षेत्रातील जवळपास दोनशेहून अधिक क्षेत्रांमध्ये पदे रिक्त आहेत. असे असून देखील राज्य सरकार जाणीवपूर्वक नोकर भरती करत नसल्यामुळे युवकांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 

बहुतांश युवकांनी रोजंदारी गमावल्यामुळे आपले जीवन देखील संपवले आहे. या गोष्टीला संपूर्णपणे राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार  असल्याचाआरोप आंदोलनकर्त्यांनी लावला आहे.

हे देखील पहा -

लवकरात लवकर राज्य सरकारने विविध क्षेत्रामध्ये रिक्त पद असलेल्या ठिकाणी नोकर भरती सुरू करून बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी भाजपच्या युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लब येथे राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील केली आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com