महाविकास आघाडी सरकार विरोधात कृष्णा नदीत भाजपची जलसमाधी आंदोलन ...

विजय पाटील
गुरुवार, 3 जून 2021

सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत असणारी पुनर्विचार याचिका फेटाळल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले आहे

सांगली : सर्वोच्च न्यायालयात Supreme Court ओबीसी OBC आरक्षणाबाबत असणारी पुनर्विचार याचिका फेटाळल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये Sangali भाजपच्या BJP वतीने महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील फेर याचिका फेटाळल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी याबाबत कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही. BJPs Jalasamadhi agitation in Krishna river against Mahavikas Aghadi government

इतकेच नव्हे तर सर्वोच्च  न्यायालयामध्ये या गोष्टी सादर करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.  त्यावेळेस सुद्धा सादर करण्यात आले नाहीत. ओबीसी समाजाच्या हक्काचा आरक्षण Reservations मिळण्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे. राज्यातील ओबीसी समाजाचा एम्पिरिकल डाटा जमा करून तो तात्काळ न्यायालयात सादर करावा.

ओबीसी आरक्षणाकरीता भाजपा ओबीसी मोर्चाचे 'आक्रोश  आंदोलन  

त्याचबरोबर लवकरात लवकर राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन करावे. विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये भाजपाच्या ओबीसी मोर्चाकडून आंदोलन करण्यात आला आहे. सांगलीतील कृष्णा Krishna नदीच्या सरकारी घाटा या ठिकाणी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा नदीच्या पात्रात उतरत आंदोलन करण्यात आले आहे. BJPs Jalasamadhi agitation in Krishna river against Mahavikas Aghadi government 

हे देखील पहा 

या वेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या हक्काचा आरक्षण देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आल आहे. तसेच राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत तातडीने भूमिका घ्यावी. अन्यथा या पुढील काळात याच कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पूर्ण जलसमाधी घेण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live