सरकार पाडण्यासाठी भाजपचा नवा मुहूर्त

साम टीव्ही
गुरुवार, 11 मार्च 2021

राज्यात मिशन भाजप सुरु आहे आणि  पुढच्या 3 ते 4 महिन्यात आम्ही सरकारमध्ये येऊ असा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. प्रयत्न करणा-यांना कधी अपयश येत नाही. हे शुभकार्य कधी ना कधी होणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

राज्यात लवकरच सत्ता बदल होणार असल्याचं भाकीत पुन्हा एकदा मुनगंटीवार यांनी केलंय.

राज्यात मिशन भाजप सुरु आहे आणि  पुढच्या 3 ते 4 महिन्यात आम्ही सरकारमध्ये येऊ असा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. प्रयत्न करणा-यांना कधी अपयश येत नाही. हे शुभकार्य कधी ना कधी होणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात सरकार सत्तेत आल्यादिवसापासून हे सरकार कोसळणार असं विरोधकांकडून सांगण्यात येतंय. नेहमी नव्या नव्या तारखा दिल्या जातात. आताही सरकार कोसळण्यासाठी नवा मुहूर्त सांगण्यात आलाय. येत्या 3 महिन्यात सरकार कोसळेल असा दावा मुनगंटीवारांनी केलाय.

अधिवेशन संपल्यासंपल्या फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी नागपूरमध्ये संघमुख्यालयात धाव घेत सरसंघचालकांशी चर्चा केली. मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा महाविकास आघाडीकडून चांगलाच समाचार घेतला.

राज्यात सत्तापालट होत नाही त्यामुळं भाजपमध्ये गेलेल्या आयारामांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता शांत करण्यासाठी हा नवा मुहूर्त असल्याची चर्चा आहे. येत्या 3 महिन्यातच खरं काय आणि खोटं काय हे स्पष्ट होईल.
 
फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live